मुंबई १२ फेब्रुवारी, २०१८ : कलर्स मराठीवरच्या घाडगे & सून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय...घाडगेंच्या घरात सध्या भक्तिमय वातावरण आहे. जीवघेण्या अपघातातून बचावलेल्या अक्षयसाठी आणि अक्षय-अमृताचं नवरा-बायकोचं नातं खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी माईंनी जेजुरीला जाण्याचा निर्णय घेतलाय. घाडगेच्या परंपरेनुसार नव्या नवरा-नवरीने लग्नानंतर एकदा जोड्याने जाऊन खंडोबाचे आशीर्वाद घ्यायचे असतात. याच वेळेस अक्षय आणि अमृताला जेजुरी मंदिराच्या ४०० पायऱ्या चढायच्या होत्या. परंतु अमृताच्या पायाला अचानक लागल्यामुळे अक्षयने अमृताला उचलून घेतले आणि खरोखरच सीन मध्ये चिन्मयने मंदिराच्या ३०० पायऱ्या चढल्या. अक्षयच्या प्रेमात पडलेल्या अमृतासाठी मात्र हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरणार आहे...खंडोबाच्या दर्श्नासोबतच अक्षय-अमृताच्या लग्नाचा जागरण-गोंधळाचा विधीही पार पडणार आहे...
