"तू माझा सांगाती" मालिकेत विठ्ठलपंत कुलकर्णीच्या एका वेगळ्या भूमिकेत शेखर फडके

मुंबई, १३ फेब्रुवारी, २०१८ : प्रत्येक कलाकार हा आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. आपली मालिकेत किंवा सिनेमात असणारी व्यक्तिरेखा चांगली साकारली जावी यासाठी तो ती भूमिका समरसून जगत असतो. आपली प्रत्येक भूमिका अगदी प्रामाणिकपणे साकारणारे शेखर फडके आपल्याला एका नव्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या "तू माझा सांगातीया मालिकेत "विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणजेच ज्ञानेश्वरांच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. नेहमीपेक्षा वेगळा लुक आहे,  तसेच चरित्र  भूमिका या मालिकेत ते साकारत आहे. या मालिकेचे निर्माते आणिमालिका दिग्दर्शक आहेत ,संगीत कुलकर्णी... 
अनेक मराठी नाटकांमध्येमालिकांमध्ये तसेच सिनेमांमध्ये ,शेखर फडके यांच्या अभिनयाचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळाले आहेत. या मालिकेतही त्यांच्या अभिनयातील वैविध्यता आपल्याला पाहायला मिळते आहे. आतापर्यंत त्यांनी विनोदी भूमिका ,तसेच कलर्स मराठी वरील "सरस्वतीमालिकेतील"भिकूमामाहा विनोदी खलनायक साकारला आहे,जो तुम्हा प्रेक्षकांच्या मनाला भावला  होताआणि आता तू माझा सांगाती या मालिकेत  त्यांचा गंभीर स्वरूपाचा अभिनय पाहायला मिळतोय.  
"विठ्ठलहे पंढरपूरची वारी करणाऱ्या  वारकऱ्याच्या मुखी असलेलं नावं. या नावाची महिमाची अशी आहे की नाव उच्चारताच अंगी उत्साह जाणवतो.  या विठ्ठलाचे अनेक भक्त होतेज्यांना आपण संत म्हणून ओळखतो. अशा या संतांची परंपरा सांगणारी कथाकलर्स मराठीवरील   "तू माझा सांगातीया मालिकेत पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत संत ज्ञानेश्वर यांची महती सांगण्यात येत आहे. शेखर फडके यांनी आपल्या विनोदी शैलीतल्या भूमिकांनी प्रेक्षकांना हसवलं आहेते साकारत असलेली ही विठ्ठलपंतांची भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल यात शंका नाही.   

Subscribe to receive free email updates: