मुंबई १३ फेब्रुवारी, २०१८ : कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. कार्यक्रमातील स्पर्धकांच्या उत्तम गायकीमुळे या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांची हीच पसंती लक्षात घेऊन आज कार्यक्रमातील परीक्षक महेश काळे यांनी कलर्स मराठी वाहिनीचे Facebook, Twitter & Instagram Page hack केले आहे. म्हणजे आज महेश काळे संपूर्ण दिवस या माध्यमांद्वारे त्यांच्या प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत, काही महत्वाच्या गोष्टी त्यांच्या सोबत शेआर करणार आहेत. कलर्स मराठीने हाती घेतलेल्या प्रसिद्धीच्या या आगळ्यावेगळ्या टेकनिकला सोशल मिडीयावर प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

महेश काळे यांनी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना दिलेले काही स्केचेस, चित्र देखील यादरम्यान शेअर केली. तेंव्हा तुम्ही देखील आता महेश काळे यांच्याशी संवाद साधू शकता कलर्स मराठीच्या फेसबुक पेज, ट्वीटर आणि Insta. #MKHacksCM Mahesh Kale #ColorsMarathi #MaheshKal e