शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या श्री साईप्रसादालयात नविन ग्रॅनाईट फ्लोअरिंगचा व नविन भक्तनिवासस्थान (५०० रुम) रस्त्याचे डांबरीकरणाचा शुभारंभ संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या हस्ते विधीवत करण्यात आला.
यावेळी संस्थानचे उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडेपाटील, कार्यकारी अभियंता रविंद्र घुले, प्रशासकीय अधिकारी उत्तमराव गोंदकर, उपअभियंता सर्वश्री रविंद्र भामरे, दिनकर देसाई, चेतन खैरनार, प्रसादालय विभाग प्रमुख विष्णु थोरात व कर्मचारी उपस्थित होते.
श्री साईबाबा समाधी शताब्दीच्या अनुषंगाने श्री साईप्रसादालयातील भोजन हॉल व पाकगृहात जुने व्हेट्रीफाईड टाईल्स काढुण नविन ग्रॅनाईट फ्लोअरिंग बसविण्याचा निर्णय व्यवस्थापन मंडळाने घेतला आहे. सुमारे ७० हजार चौ.मिटर ग्रॅनाईट फ्लोअरिंग बसविण्यात येणार असून टॅण ब्राऊन व स्टिल ग्रे या श्रेणीतील ग्रॅनाईटचा वापर करण्यात येणार आहे. याकरीता १ कोटी ८९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच नविन भक्तनिवासस्थान परिसरातील रस्ता व वाहनतळाचे डांबरीकरण करण्याचा निर्णय व्यवस्थापन मंडळाने घेतला असुन सुमारे ११०० मिटर लांबीचा रस्ता व सुमारे ११४० चौ.मिटर वाहनतळाचा यात समावेश आहे. यामध्ये पावसाचे पाणी रस्त्यांच्या कडेला व वाहनतळात भरले जावु नये याकरीता अंतर्गत पाईपलाईनचा वापर करण्यात येणार आहे. या डांबरीकरणाच्या कामाकरीता ३८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ही दोन्ही कामे येत्या ५ महिन्यात पुर्ण करण्यात येणार आहे.
Shirdi:
On behalf of the Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi, the work of new Granite flooring of Shri Sai Prasadalaya as well as the asphalting work of road to New Bhakta Niwas (500 Rooms) was started at the auspicious hands of Dr. Suresh Haware, Chairman of the Trust under full religious aspects.
On this occasion Sansthan Dy Collector Mr. Dhanajay Nikam, Mr. Manoj Ghodepatil, Executive Engineer Mr. Ravindra Dhule, Administrative Officer Mr. Uttamrao Gondkar, Dy. Engineer S/Shri. Ravindra Bhamre, Dinkar Desai, Chetan Khairnar, Prasadalaya Dept. Head Mr. Vishnu Thorat and staff members were present.
Management Committee of the Shri Saibaba Sansthan Trust Shirdi, has taken a decision to remove the old vitrified tiles from Dining Hall of Shri Sai Prasadalaya and to fit in new Granite flooring on the occasion of Shri Saibaba Samadhi Centenary Year Celebrations. Around 70,000 Sq. Mtrs of granite flooring will be placed and Tan Brown and Steel Grey Grade Granite will be used for the same. The estimated expenditure on this work is around Rs. 1.89 Crores. Management Committee has further taken a decision for asphalting of road in the area of New Bhakta Niwas and for the car parking area. Under this a 1,100 meters road and 1,140 sq mtrs of car parking will be asphalted. The work will include arrangements with internal pipelines so that the rainwater will not flood the sides of the roads and car parking areas. The expenditure on asphalting work is estimated at Rs. 38 Lakhs and the same will be completed within 5 months from now.