फ्रेशर्स च्या ३१ डिसेंबरच्या पार्टीत पोलिसांची रेड

 
झी युवावरील फ्रेशर्स ची धमाल जबरदस्त सुरु आहे. सम्राटची कब्बडी ची टीम सुद्धा बनलीय त्यामुळे स्वारी भलतीच खुश आहे. एकांकिका जिंकण्याची आणि ३१ डिसेम्बरची एकत्र पार्टी होत असताना मालिकेत आता एक वेगळाच टर्न येणार आहे. फ्रेशर्सच्या ३१ डिसेंबरच्या पार्टीत वोडका , मारणारी आणि पोलिसांची एन्ट्री . आता फ्रेशर्स च्या ३१ डिसेंबरच्या पार्टीत ही मुले नक्की असं काय करत होते कि ज्यामुळे पोलिसांनी रेड मारली असं तुम्हाला वाटतं असेल . तर सगळ्यांनाच माहित आहे , कि आपले फ्रेशर्स अगदीच  साधे आहेत  , त्यांनी केवळ पाणीपुरीची पार्टी ठेवली होती . पण त्यात एक गडबड झाली म्हणजे केली गेली. मंगेशने  पाणीपुरीच्या पाण्यांत वोडका मिक्स केली . फ्रेशर्सना याबद्दल काहीच कल्पना नव्हती त्यामुळे त्यांनी पाणीपुरी खाण्याची स्पर्धा सुद्धा खेळले . आता भरपूर वोडकावाली पाणीपुरी खाल्ल्याने सगळेच झाले झिंगाट !!  दारूच्या विरुद्ध असलेल्या फ्रेशर्सना दारूची चव सुद्धा माहित नाही पण  पाणीपुरीच्या पाण्यात मिक्स झाल्यामुळे गेली कि वोडका पोटात . आता हे जरी चुकून झाले असले तरी या पुढे होणारी धमाल शब्दात सांगता येणार नाही ... आणि हि धमाल सुरु असतानाच पोलिसांनी मारली रेड .... आता फ्रेशर्स ३१ डिसेम्बरची रात्र तुरुंगात घालवतात कि नक्की काय होते हे पाहण्यासाठी बघत राहा फ्रेशर्स फक्त झी युवावर .

Subscribe to receive free email updates: