‘विकता का उत्तर’च्या स्पर्धकांनी मांडले नववर्षाचे ‘सूत्र’ रितेश देखमुखने शेअर केले स्वतःचे नवीन वर्षाचे प्लॅन्स

नाविन्यउत्साह आणि अनेक नव्या संकल्पांचे २०१७ हे आगामी वर्ष लवकरच आपल्या जीवनात चैतन्य आणणार आहेशिवाय सरत्या वर्षातील आठवणी आणि मिळालेले यश गाठीशी घेऊन संपूर्ण जग नवीन वर्षात पहिले पाऊल टाकणार आहे. अशावेळी नववर्षाच्या या सोहळ्यात स्टार प्रवाहवरील विकता का उत्तर’ या शोने जनसामान्यांना आपल्या स्पर्धकांमार्फत आगामी वर्षाचे नवे सूत्र देऊ केले आहे. दर शुक्रवार ते रविवार संध्याकाळी ७.३० वा. अरे हाय काय आणि नाय काय...असे म्हणना-या  होस्ट रितेश देशमुखच्या या क्वीज शोमध्ये सामन्यांचा मेळा रंगलेला दिसणार आहे. गेल्या आठवड्यात विविध लाडवांची लज्जत घेणारे हॅप्पी मॅन म्हणजेच नाशिकचे शरद होळकर यांनी अंतिम टप्प्यात मारलेली रोमांचक मजल या भागात पाहायला मिळणार आहे. तसेच सुगंधा भट्ट या गृहिणीनेदेखील विकता का उत्तरच्या सेटवर येऊन नववर्षाच्या पूर्वसंध्येला चारचांद लावले.
एका सामान्य गृहिणीमध्ये असलेली भाव करण्याचे उपजत कसब या भागात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. हे नसे थोडके म्हणूनरविवार १ जानेवारीला होणाऱ्या या शोमध्ये आलेल्या यवतमाळच्या वनिता तलवारे या महिलाचे व्यक्तिमत्वदेखील स्फुरण देणारे ठरणार आहे. पतीच्या फर्निचर व्यवसायाला मदत करतानाच आपल्या मुलांवर लक्ष देण्यासाठी घरात साडी आणि बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्या या रणरागीनीची खेळी प्रेक्षकांना नवीन वर्षाची मोठी मेजवानी ठरणार आहे. तसेच गौरव घोडके या २५ वर्षीय विवाहोत्सुक तरुणाचा रोमांचित खेळ देखील विकता का उत्तरचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. त्यांनीदेखील विकता का उत्तरच्या अंतिम प्रश्नांपर्यंत पोहोचत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाखांची कमाई केली आहे. गौरव इलेकट्रोनिक इंजिनियर असून त्यांना आय पी एस अधिकारी बनायचे आहेतसेच नवीन वर्षात या शोच्या माध्यमातून आपल्याला लग्नासाठी चांगला प्रस्ताव येईल असा विश्वास त्यांचा आहे. या रविवारच्या भागाचे खूप मोठे सरप्राईज म्हणजे  रितेश आपले नववर्षाचे प्लॅन्स देखील आपल्या चाह्त्यांसोबत शेअर करणार असल्यामुळे विकता का उत्तर’ चा हा आठवडा खऱ्या अर्थाने सर्व महाराष्ट्राला शुभेच्छा देणारा ठरणार आहे. 

Subscribe to receive free email updates: