“बन्नो तेरा” या गाण्यावर कंगनाच्या लावणीचा तडका
कंगना रनौत पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर !
मुंबई, १७ फेब्रुवारी : कलर्स मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नृत्यातील MADness ने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक नेहेमीच आपल्या प्रेक्षकांना आणि परीक्षकांना आपल्या सुंदर नृत्याद्वारे सरप्राईझ देत असतात, पण यावेळेस मंच्यावर स्पर्धकांना मिळालं एक सरप्राईझ ! क्वीन, तनु वेड्स मनु अश्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आपल्या सगळ्यांची लाडकी आणि बॉलीवूडची क्वीन म्हणजेच कंगना रनौतची 2 MAD च्या सेटवर धम्माकेदार एन्ट्री झाली. 2 MAD द्वारे कंगना पहिल्यांदाच मराठी टेलिव्हीजनवर एका डान्स शोमध्ये आली आहे. या खास एपिसोडमध्ये स्पर्धकांनी कंगनाच्या गाण्यावर डान्स करून तिला सरप्राईझ दिलं. महाराष्ट्रात असलेले भन्नाट talent पाहून कंगना थक्क झाली. 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सरचा कंगना रनौत सोबतचा हा रंगून विशेष भाग तुम्हाला बघता येणार आहे २१ फेब्रुवारीला फक्त कलर्स मराठीवर रात्री ९.३० वा.
जिच्या अभिनयाची संपूर्ण दुनिया फॅन आहे अश्या अभिनेत्रीसमोर डान्स करायचा म्हणजे सगळ्याच स्पर्धकांना पहिले थोडं दडपण आलं. पण कंगनाने आपल्या दिलखुलास स्वभावाने त्यांच हे दडपण अगदी सहजरीत्या दूर केलं. कंगनाने कार्यक्रमामध्ये मराठी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला, ज्याने उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धकांनी कंगना बरोबर बऱ्याच गंमती जमती देखील केल्या ज्या तुम्हाला या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. मराठी टेलिव्हीजनवर प्रेक्षकांना पहिल्यांदाच कंगनाला बघायला मिळणार आहे एका वेगळ्याच अंदाजमध्ये. 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर च्या सेटवर येऊन कंगना खूपच खुश होती त्यावर ती म्हणाली, “मी खूप खुश आहे या मंच्यावर येऊन. स्पर्धक खूप talented आहेत,त्यांच्या डान्समध्ये MADness आहे.. हा डान्स शो आहे आणि डान्स म्हंटल कि, MADness हा आलाच. माझ्या मते प्रत्येक क्रियेटीव्ह कामामध्ये MADness असावाच लागतो”.
तेंव्हा बघायला विसरू नका 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर चा “रंगून” स्पेशल भाग कंगना रनौतसोबत २१ फेब्रुवारीला फक्त कलर्स मराठीवर रात्री ९.३० वा.