झी युवावर "प्रेम हे" या मालिकेची पहिली गोष्ट आहे "रुपेरी वाळूत "

प्रेमाला भाषा नसते , जात नसते , धर्म नसतो ... असते ती फक्त भावना .... आणि या एका भावनेच्या भोवती प्रेमीयुगलांचं  आयुष्य एकवटलेलं असतं.  झी युवावर  २७ फेब्रुवारीपासून सोमवार आणि मंगळवार रात्री  वाजताएक नवी कोरी प्रेमाच्या विविध गोष्टी सांगणारी मालिका सुरु होत आहे . "प्रेम हे " प्रेमात असलेल्या , आणि नसलेल्याप्रत्येकासाठी हि मालिका आहे .प्रेम करणे सोपे आहे पण ते निभावणे तेवढेच कठीण असतेअसे म्हटले जातेतरीहीप्रेम करणारे प्रेम करतच राहतात.  प्रेम हे केवळ आपल्या जोडीदाराला मिळवणं नसत . त्या व्यक्ती साठी मनालापटेल आणि नातं टिकवेल असे सर्व करण्याची तयारी असते आणि कुठच्याही कारणाने आपल्या आवडत्या व्यक्तीलागमवावं लागलं तर मात्र ही गोष्ट आपल्यासाठी  खूप कष्टप्रद आणि त्रासदायक ठरू शकतेप्रेमाच्या अश्या असंख्यभावना अनेकांच्या मनात धुमसत असतातशहरातील लोक बऱ्याच अंशी बोलून मोकळी होतात पण ग्रामीण  भागातआजही अनेकांच्या प्रेमकहाण्या या अव्यक्तच राहिल्या आहेत . याच विषयाला धरून "प्रेम हेया मालिकेची पहिलीगोष्ट आहे "रुपेरी वाळूत "  एका गावात राहणारे सुनील आणि राधिका  ( वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान ) ,एकमेकांवर प्रेम तर करतात पण एकमेंकाना व्यक्त होणं तितकसं सोपं नसतंमग त्यांना जोडणारी आणित्यांच्यातील प्रेम फुलवणारी गोष्ट म्हणजे एक गाणं "रुपेरी वाळूत ..."  आणि ह्या गाण्याबरोबर त्यांचं फुलत जाणारपण अव्यक्त प्रेम ..  आणि  याचबरोबर त्यांच्या प्रेमाच्या आडवं येणार , घर समाज , गाव आणि लग्न ....प्रेम म्हणजेउभ्या आणि आडव्या धाग्यांनी विनलेलं नातं असत  .. जे मनात असतं ते शब्दात मांडता येत नाही ... अनेकांनाआपल्या प्रिय व्यक्तीला केवळ पाहण्यात जीवनाचा अर्थ लागतो पण ती व्यक्ती आपली व्हावी हि भावनामनमोकळेपणाने तिलाही  सांगू शकणारे अनेकजण आपल्याला अनेक ग्रामीण भागात सापडतात . दोन जिवांचेमधुर मीलन म्हणजेच  प्रेम असतं. . पण त्यासाठी त्या दोघांनीही प्रयत्न करण तेवढच महत्वाच असतअशी अनेकतरुण असतात कि जे आपल्याला काय आवडतं त्याही पेक्षा तिला काय आवडतं हे महत्वाचं मानतात आणि तिच्यानकळत ,  ते तिला मिळवून देण्यासाठी धडपड करतातहता भावनेतही  प्रेमचं असतं.
अख्ख
झी युवावरील "प्रेम हे " या मालिकेतील पहिली गोष्ट आहे "रुपेरी वाळूत " .  ग्रामीण भागातील अव्यक्त प्रेम भावनाअधोरेखित करणारी हि गोष्ट असून यात वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेतया भागाचेदिगदर्शन  संतोष मांजरेकर यांनी केले असून सचिन तडाखे यांनी हि कथा लिहिली आहे .  समीर पेणकर यांचे सवांदआणि पटकथा आहे . "प्रेम हेया मालिकेचे संगीत निलेश मोहरीर यांनी केले असून हृषीकेश रानडे आणि केतकीमाटेगांवकर यांनी शीर्षक गीत गायले आहे .

Subscribe to receive free email updates: