मुंबई, १० फेब्रुवारी, २०१७ : वॅलेंटाईन्स डे हा सगळ्यांसाठीच अगदी स्पेशल असतो. हा दिवस प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. ते म्हणतातना प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमच आमचं सेम असतं ... जगातील सगळ्यात सुंदर भावना म्हणजे प्रेम. प्रत्येक व्यक्ती प्रेम हे वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करते. याच प्रेमाच्या रंगाची उधळण होणार आहे कलर्स मराठीवर वॅलेंटाईन्स डे निमित्त खास प्रेक्षकांसाठी. कलर्स मराठीवर प्रेमाचे अनेकविध रंग आणि छटा उलगडून दाखवणारा लव्हेबल कार्यक्रम “तुझी माझी लव्ह स्टोरी” १९ फेब्रुवारी संध्याकाळी ६ वाजता.
या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली जेंव्हा केतकी माटेगावकर हिने आपल्या सुरेल आणि मधुर आवाजामध्ये प्रियकरा आणि जीव गुंतला हे गाणे गाऊन जमलेल्या सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली जेंव्हा वैभव तत्ववादी याने सावर रे आणि येड लागले या गाण्यावर पॉवरपॅक डान्स केला ज्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव केला आणि डान्सला उत्तम प्रतिसाद दिला. तसेच पुष्कर जोग, मृण्मयी गोंधळकर या दोघांनी जनम जनम आणि आशिकी 2 मधील हम तेरे बिन या रोमँटिक गाण्यावर खूप सुंदर डान्स सादर केला तर पुष्कर जोग, मीरा जोशी आणि संकेत पाठक यांनी ए दिल है मुश्कील, इश्क वाला लव्ह या गाण्यावर परफॉर्मन्स केला.
तेंव्हा बघायला विसरू नका वॅलेंटाईन्स डे खास - कलर्स मराठीवर प्रेमाचे रंग आणि छटा उलगडून दाखवणारा लव्हेबल कार्यक्रम “तुझी माझी लव्ह स्टोरी” १९ फेब्रुवारी संध्याकाळी ६ वाजता.