‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ वर सैराटची मोहोर

चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा आणि कलाकाररसिकांचे ज्या पुरस्कार सोहळयाकडे विशेष लक्ष असते असा पुरस्कार सोहळा म्हणजेमहाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कार सोहळ्यात आपल्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळावीअसं सगळ्याचं कलाकारांना वाटतं. यंदाच्यामहाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक पसंतीची मोहोर ‘सैराट’ चित्रपटावर उमटली असून सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री पुरस्काराचे मानकरी आकाश ठोसर व रिंकू राजगुरू ठरले. या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण रविवार १९ मार्चला  सायंकाळी ७.०० झी टॅाकीजवर  होणार आहे.
रसिकांनी नोंदवलेल्या सर्वाधिक मतांनुसार इतर विभागांमध्ये फेव्हरेट दिग्दर्शक म्हणून सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. सैराट मधील ‘झिंगाट’ व ‘आताच बया का बावरलं’ या गाण्यांसाठी अजय – अतुल व श्रेया घोषाल यांना गौरवण्यात आलं. फेव्हरेट नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार  म्हणून आकाश ठोसर व नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार रिंकू राजगुरू ने पटकावला. फेव्हरेट स्टाईल आयकॉन म्हणूनआकाश ठोसरला पुरस्कार देण्यात आला. फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ पुरस्कार अभिनेत्री रिंकू राजगुरूने पटकाविला तर सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी छाया कदम तसेच सहाय्यक अभिनेता पुरस्कारासाठी तानाजी गालगुंडे ह्यांना प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळाली. कट्यार काळजात घुसलीया चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेता सचिन पिळगांवकर यांना गौरवण्यात आले तर सर्वोत्कृष्ट गीताचा बहुमान ‘झिंगाट’ ने पटकावला.
अभिनेता श्रेयस तळपदे, अमेय वाघचं खुसखुशीत निवेदन, सुखदा खांडकेकरने सादर केलीली गणेशवंदना,  अतुल तोडणकर, अभिजीत चव्हाण, प्रियदर्शन जाधव, पुष्कर क्षोत्री, प्राजक्ता हनमघर, मेघना एरंडे, यांनी सादर केलेलंशोकसभा हे प्रहसन, ‘फिल्मी फिल्मी’ धमाकेदार नाट्य, सई ताम्हणकर, रिंकू राजगुरू, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, मृणाल ठाकूर यांचे बहारदार नृत्य परफॉमन्स, आकाश ठोसर व वैभव तत्ववादी यांचा रॉकिंग डान्स, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे महेश मांजरेकर यांनी सांगितलेले भन्नाट किस्से असा  मनोरंजनाचा भरगच्च नजराणा असलेला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? चा  हा नेत्रदीपक सोहळा रविवार १९ मार्चला  सायंकाळी ७.०० वाजता झी टॅाकीजवरप्रक्षेपित होणार आहे. 

Subscribe to receive free email updates:

Related Posts :