अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची
आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठे कडे वाटचाल
मराठी चित्रपट सृष्टीतील एकापेक्षा एक दर्जेदार अशा मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या बाजारपेठेत मानाचं स्थान मिळून आपला मराठी चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजेयासाठी म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने इंटरनॅशनल फिल्म मार्केट सेल आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सबमिशन सेल असे विभाग सुरु केले आहेत.या विषयी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व संचालक मंडळाने पुढाकार घेऊन मराठी निर्मात्यांसाठी सिनेमा विकण्यासाठी अजून एक नवीन दालन खुले केले आहे.
या वर्षी 'कानयेथे एप्रिल ते एप्रिल 2017 ला भरणाऱ्या 'कान्स मीप (MIP) टीव्हीया आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या बाजारपेठेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भाग घेणार आहे. यासाठी या संचालक चैत्राली डोंगरे यांची निवड झाली असून इंटरनॅशनल फिल्म सेल च्या मुख्य व्यवस्थापिका निलकांती पाटेकर यांना कांस ला पाठविणार आहे। कुठल्यातरी इंटरनॅशनल फिल्म मार्केट मध्ये महामंडळ प्रतिमाच आपला सहभाग नोंदविणार असून महामंडळाद्वारे देशोदेशीचे बायर्स यामुळे मराठी निर्मात्यांना उपलब्ध होणार आहे. आताच्या डिजिटल युगामध्ये वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या टेरिटरीजसाठी तऱ्हेतऱ्हेचे हक्क विकले जाऊ शकतात. अशा या बाजारपेठांमध्ये निर्मात्यांना आपल्या डॉक्युमेंट्रीजशॉर्ट फिल्म्सफिचर फिल्म्सम्युजिक व्हिडीओअॅनिमेशन फिल्म्स चे सॅटेलाईटडिजिटल टेरिस्ट्रीअलडीव्हीडीएअरलाईन्सहॉटेल्सचे हक्क विविध देशांना विकता येतात. चित्रपट कितीही जुना असला तरी सुद्धा निर्मात्याकडील त्या चित्रपटाचे हक्क आंतरराष्ट्रीय पातळीवर विकण्याचा प्रयत्न करता येतो.  त्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने हा विभाग चालू केला आहे.  त्या द्वारे महत्वाच्या विविध फिल्म मार्केटस मध्ये मराठी चित्रपट विक्रीसाठी नेण्याचा महामंडळाचा प्रयत्न असेल.
'कान्स मीप (MIP) टीव्हीया आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या बाजारपेठेत चित्रपटांवरील हक्कांच्या विक्रीसाठी इच्छूक असल्यास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात इंटरनॅशनल फिल्म मार्केट सेल मध्ये नोंद करावी. ह्या साठी चित्रपटाला इंग्लिश सबटायटल असणे आवश्यक आहे. ह्या संदर्भातील अधिक माहितीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात अथवा internationalffsubmission@gmail.com येथे संपर्क साधावाअसे अध्यक्ष मेघराज राजेभोसलेउपाध्यक्ष धनाजी यमकर व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Subscribe to receive free email updates: