मुंबई २१ मार्च, २०१८ : राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये सध्या प्रेम आणि राधा समोर अनेक अडचणी आणि आव्हाने येत आहेत. एकीकडे दीपिकाची बळजबरी आणि दुसरीकडे राधाचा असलेला विश्वास तसेच आईला दिलेले वचन यामध्ये प्रेम पूर्णपणे अडकलेला आहे. आदित्य श्रावणी काकुच्या वारंवार अन्विताला घालून पाडून बोलण्याला कंटाळून आदित्यने तिला घराबाहेर काढले होते. राधा आणि प्रेमला हे कळताच ते श्रावणी काकुला शोधायला घराबाहेर पडतात आणि राधाच्या सांगण्यावरून श्रावणी काकु घरी येण्यास संमती देते आणि घरी येते देखील. पण, आता येणाऱ्या भागांमध्ये प्रेम आणि राधाच्या वाढत्या मैत्रीला लक्षात घेऊन दीपिका आणि तिची आई प्रेमला एका तासाची मुदत देणार आहेत. आता प्रेम कुठला मार्ग स्वीकारणार ? आईला दिलेले वचन कसे पूर्ण करणार ? राधाचा प्रेमवर असलेला विश्वास कायम रहाण्यासाठी प्रेम काय करणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली मालिकेचा महाएपिसोड २५ मार्च फक्त कलर्स मराठीवर.
राधा आणि प्रेमची वाढती मैत्री बघून दीपिकाला प्रेम आणि राधाच्या नात्यावर संशय येतो. येणाऱ्या भागांमध्ये दीपिका आणि तिची आई प्रेमला एका तासाची मुदत देतात, या एका तासात प्रेमने राधा घटस्फोट नाही दिला तर त्याचा व्यवसाय आणि त्याचे व्यक्तीक आयुष्य देखील धोक्यात येईल अशी धमकी देखील ते प्रेमला देतात. प्रेम दीपिका आणि तिच्या आईच्या धमकीमुळे खूप गोंधळून जातो. दीपिका गरोदर आहे पण हे बाळ खरोखरच प्रेमचं आहे का ? कि, प्रेमला अडकविण्यासाठी दीपिका प्रेमशी खोटं बोलते आहे ? प्रेमच्या मनात असणारे हे प्रश्न तो राधाला सांगेल का ? राधाचं यावर काय म्हणन असेल ? असे अनेक प्रश्न प्रेमला पडणार आहेत.
या संकंटामधून कसा मार्ग काढावा ? या अडचणीतून बाहेर येण्यासाठी प्रेम राधाला विश्वासात घेऊन त्याच्या भावना व्यक्त करेल का ? राधा त्याला समजून घेईल का ? प्रेमला राधाची साथ मिळेल का ? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा राधा प्रेम रंगी रंगली फक्त कलर्स मराठीवर.