
गायिका सावनी रविंद्रचं नुकतंच लग्न झालं आहे. सावनीच्या लग्नानंतर तिचं पहिलं रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. जे सावनीने आपल्या पतीला लग्नानंतर दिलेलं सरप्राइज गिफ्ट आहे.
ह्या आगळ्या सरप्राइज गिफ्ट विषयी नववधू सावनी सांगते,”मला आशिषला वेडिंग गिफ्ट देण्याची इच्छा होती. काय गिफ्ट करावं ह्याचा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं,की माझे सूर हेच माझं वैशिषठ्य आहे. त्यामूळे मी त्याला एक सुरेल सरप्राइज द्यायचं ठरवलं.”
ती पूढे सांगते, “जूनी गाणी गाण्यापेक्षा त्याच्यासाठीच एक गाणं तयार करायचं मी नक्की केलं. आणि मग माझ्या भावाला वैभव जोशी आणि मित्र सागर धोते, मयुर धांधेला ह्यात सहभागी केलं. वैभव जोशीने लिहीलेल्या गीताला सागर धोतेने संगीतबध्द केलंय. तर मयुरने गाण्यात माझ्या पतीचं आशिषचं पेटिंग बनवलंय.”
“मी आमच्या लग्नाच्या ‘संगीत’च्या कार्यक्रमाला हे सरप्राइज आशिषला दिलं. माझ्या ह्या रोमँटिक सरप्राइजनंतर त्याच्या डोळ्यात आनंदाक्षु तरळले होते. आणि आता मी तेच माहिया गाणं ऑफिशिअली लाँच केलंय. जसं आशिषला गाणं आवडलं तसंच ते सर्व कानसेनांनाही आवडेल, असा मला विश्वास वाटतो.”
you Tube Link - Maahiya - Song