कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस !


  • मेघा धाडे बनली बिग बॉस मराठीच्या घराची नवी कॅप्टन ...
  • त्यागराज खाडिलकर यांची बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झाली एन्ट्री !
  • आज रंगणार महेश मांजरेकर यांच्यासोबत WEEKEND चा डाव
मुंबई २६ मे२०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मर्डर मिस्ट्री हे कार्य देण्यात आले होते. या टास्क मध्ये ज्यांनी उत्तम कार्य केले त्यांना कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी उभे रहाण्याची संधी मिळणार होती. घरातील सदस्यांनी सर्वानुमताने सुशांत आणि मेघाला कॅप्टनसीसाठी उमेदवार म्हणून निवडले. बिग बॉस यांनी “हुकमी चौकट” हे कॅप्टनसीचे कार्य घरतील सदस्यांवर सोपावले. ज्यामध्ये उमेदवारांच्या सहनशीलतेची कसोटी लागली. टीम मेघा आणि टीम सुशांत यांना युक्तीद्वारे आणि चालाखीने चांगलीच लढत दिली. सुशांत आणि मेघामध्ये कोण घराचा नवा कॅप्टन बनणार कोण कॅप्टनसीच्या टास्कमध्ये बाजी मारणार हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनामध्ये होता. या दोन्ही उमेदवारांना त्यांची जागा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा होता. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्याच्या जागेवरून हटवण्याचा प्रयत्न दुसऱ्या टीममधील समर्थकांनी करायचा होता. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांपासून आपआपल्या उमेदवाराचे रक्षण करण्याचा प्रयत्न त्या उमेदवाराचे समर्थक करणार होते. प्रतिस्पर्धी समर्थकांनी दुसऱ्या टीमच्या उमेदवाराला चौकटीच्या कुठल्याही बाजूने खाली उतरण्यास भाग पाडायचे असून हाच समर्थकांचा उद्देश होता. ज्यामध्ये रेशम, आस्ताद म्हणजेच टीम सुशांत यांनी कार्याचा नियम तोडून मेघाला चौकटीच्या बाहेर पाडले त्यामुळे बिग बॉस यांनी सुशांत नव्हे तर मेघावर बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन म्हणून जबाबदारी सोपावली. तर काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे त्यागराज खाडिलकर यांची एन्ट्री झाली. तेंव्हा बघायला विसरू नका आज WEEKENDचा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मेघा, सई आणि पुष्कर मध्ये वाद विवादनाराजगी होताना दिसली. तर मेघाने घरातील सदस्यांवर नाराजगी व्यक्त केली खास करून आऊसई आणि पुष्कर यांच्यावर. आज घरामध्ये खूपच उत्साहाचे वातावरण असणार आहे. ज्यामध्ये घरातील सदस्य वेगळ्या पोशाखात दिसणार असून ते काही acts देखील सादर करणार आहेत. जसे रेशम टिपणीस श्री देवी सारखी साडी नेसून मिस्टर इंडिया मधी “I Love You” या गाण्यावर नृत्य करताना दिसणार आहे. तर आऊ शोले मधील गब्बर सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. तेंव्हा घरातील बाकीचे सदस्य काय सादर करणार आहेत हे आज प्रेक्षकांना कळेलच.
तेंव्हा बघायला विसरू नका आज WEEKENDचा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :