संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१८ दिमाखात संपन्न ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना कलागौरव पुरस्कार

मराठी मनोरंजन विश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारा ‘१८ वा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१८’ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच कमल अमरोही स्टुडियोमध्ये दिमाखात संपन्न झाला. यात संगीत देवबाभळी’ व ‘अनन्या’ या दोन नाटकानेतर पळशीची पि.टी या चित्रपटाने बाजी मारली. मालिका विभागात ‘नकळत सारे घडले’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेचा मान मिळवला. अतुल परचुरे आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांच्या खुमासदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढवली. संस्कृती कलादर्पण गौरव सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. कलावंतांच्या धमाल परफॉर्मन्समुळे हा सोहळा चांगलाच रंगला. गेली १८ वर्षे मनोरंजन विश्वात कार्यरत असणाऱ्या ‘संस्कृती कलादर्पण’च्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या कलावंत, तंत्रज्ञ,प्रसिद्धी माध्यमांचे तसेच प्रेक्षकांचे आभार संस्कृती कलादर्पण संस्थेच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यानया सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना सिनेनाट्य क्षेत्रातील त्यांच्या कार्यकर्तुत्वाबद्दल संस्कृती कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ ‘कलागौरव’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते रमेश भाटकर यांचा गौरव करण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरूप आहे. या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना हा पुरस्कार माझ्यासाठी निश्चितच आनंददायी असल्याची भावना रमेश भाटकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
नाटक विभागामध्ये सर्वोत्कृष्ट लक्षवेधी नाटक म्हणून ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’,  चित्रपट विभागातील विविध पुरस्कारांसाठी कच्चा लिंबू या चित्रपटाला विशेष लक्षवेधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच मुरांबा या चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मालिका विभागात नुपूर परुळेकर आणि हरिश दुधाडे यांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व अभिनेत्याचा मान पटकावला. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून निरंजन पत्की यांना सन्मानित करण्यात आले.  हा रंगतदार सोहळा लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१८ च्या या वर्षी नाटक, चित्रपट, मालिका, न्यूज चॅनल्स, रेडिओ या विभागातील अन्य पुरस्कार पुढील प्रमाणे –
 नाटक विभाग –
सर्वोत्कृष्ट नाटक – संगीत देवबाभळी  (भद्रकाली प्रोडक्शन्स), अनन्या ( सुधीर भट प्रोडक्शन्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – प्राजक्त देशमुख ( संगीत देवबाभळी )
सर्वोत्कृष्ट लेखक  - प्रताप फड  (अनन्या)
सर्वोत्कृष्ट लक्षवेधी नाटक - ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’
सर्वोत्कृष्ट अभिनेता – मकरंद अनासपुरे (उलट सुलट ), भरत जाधव (वेलकम जिंदगी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – शुभांगी सदावर्ते ( संगीत देवबाभळी ), ऋतुजा बागवे (अनन्या)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता -  प्रमोद  पवार, सिद्धार्थ बोडके (अनन्या)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शिवानी रांगोळे  (वेलकम जिंदगी)
लक्षवेधी अभिनेता – अमोल कोल्हे (अर्धसत्य )
लक्षवेधी अभिनेत्री - अतिषा नाईक  ( अशी ही श्यामची आई)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य – संदेश बेंद्रे  (अनन्या)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा  -  चैत्राली डोंगरे  (वेलकम जिंदगी)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – भूषण देसाई (अनन्या), प्रफुल्ल दिक्षित ( संगीत देवबाभळी )
सर्वोत्कृष्ट संगीत – आनंद ओक (संगीत देवबाभळी )
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री  - वनिता खरात  ( हम पांच)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – आनंद इंगळे ( ९ कोटी ५७ लाख ) 
चित्रपट  विभाग
सर्वोत्कृष्ट चित्रपट  - पळशीची पि.टी  ( ग्रीन प्रोडक्शन)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -  प्रसाद ओक (कच्चा लिंबू),
सर्वोत्कृष्ट कथा – धोंडिबा कारंडे (पळशीची पि.टी)
सर्वोत्कृष्ट पटकथा -  अमोल  गोळे  (नशीबवान)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – भालचंद्र कदम (नशीबवान)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू), किरण  ढाणे (पळशीची पि.टी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – शशांक शेंडे (बंदुक्या ), अंशुमन विचारे (कॉपी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - छाया कदम  (रेडू)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – अथर्व  बेडेकर  (अंड्याचा फंडा)
सर्वोत्कृष्ट संगीत – निलेश मोहरीर (तुला कळणार नाही)
सर्वोत्कृष्ट संवाद  - हर्षवर्धन (मंत्र)
प्रथम पदार्पण दिग्दर्शक – विक्रम फडणीस (हृदयांतर)
लक्षवेधी चित्रपट – कच्चा लिंबू ( टिमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स)
स्पेशल ज्युरी  पुरस्कार  - मुरांबा ( दशमी स्टूडीयोज)
सामाजिक चित्रपट पुरस्कार - अॅट्रॉसिटी (आर .पी प्रोडक्शन)
सर्वोत्कृष्ट छायांकन – फसाहत खान (मांजा)
सर्वोत्कृष्ट संकलन  - चारुश्री  रॉय (मांजा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अवधूत गुप्ते (बॉइज)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - नेहा राजपाल ( तुला कळणार नाही )
 मालिका विभाग 
सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका  - नकळत सारे घडले  (स्टार प्रवाह )
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निरंजन पत्की  – (नकळत सारे घडले )
सर्वोत्कृष्ट अभिनेता – हरिश दुधाडे – (नकळत सारे घडले )
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -  नुपूर परुळेकर  (नकळत सारे घडले )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सुनील तावडे  ( दुहेरी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – निवेदिता सराफ ( दुहेरी)
लक्षवेधी मालिका  - विठू माऊली ( स्टार प्रवाह ), बापमाणूस ( झी युवा)
कथाबाह्य मालिका – द रिअल हिरो कथा समृद्धीच्या ( झी मराठी )
न्यूज चॅनल  विभाग –
न्यूज चॅनल   - टी व्ही ९ मराठी
पुरुष सूत्रधार – कपिल देशपांडे ( झी २४ तास)
स्त्री सूत्रधार  - प्राची वैद्य (टी व्ही ९ मराठी)
रेडिओ चॅनल विभाग
सर्वोत्कृष्ट रेडिओ चॅनल - ९२.७ (बिग एफ एम)
पी.आर विभाग
गणेश गारगोटे (मिडीया वन)

Subscribe to receive free email updates: