- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आजसुध्दा रंगणार “खेळ मांडला” हे कार्य !
- आस्ताद, स्मिता आणि पुष्करमध्ये होणार भांडण !
- या कार्यामध्ये कोणती टीम बाजी मारणार ?
- मेघाने रेशमला दिले नवे नाव - “मुकी परी” ...
मुंबई १० मे, २०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज देखील रंगणार “खेळ मांडला” हे कार्य. घरातील सदस्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली. काल या टास्कची सुरुवात झाली ज्यामध्ये एक टीम लहान मुलांचे पात्र साकारत होते तर दुसरी टीम खेळण्यांचे पात्र रंगवत होते. बिग बॉस मराठीच्या घरात झालेल्या लहान मुलांना त्यांच्या खेळण्यांसोबत सतत खेळून सतवायचे होते. ज्यामध्ये मेघा आणि रेशममध्ये पुन्हाएकदा वाद रंगला. मेघाने आक्षेप घेतला कि,बिग बॉसने नियम आम्हाला बोलावून सांगितले नाहीत. या वादामध्येच आस्ताद आज बिग बॉसला अशी विनंती देखील करणार आहे कि, यापुढे मेघा बरोबर टास्क देऊ नये. या कार्यामध्ये घरातील काही सदस्यांनी बच्चेकंपनी बनून दंगा घातला. हे चिल्लर पार्टी आणि त्यांचे नखरे खेळणी बनलेल्या सदस्यांना बेहाल करून सोडणार आहेत हे नक्की. हा खेळ आज देखील रंगणार असून काल जे सदस्य खेळणी बनले होते ते आज लहान मुलं बनणार आहेत तर जे काल खेळणी बनले होते ते आज लहान मुलं बनणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका आजचा बिग बॉस मराठीचा धम्माल भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
आजच्या खेळाची सुरुवात व्यवस्थित झाली असून, पुष्कर, स्मिता आणि आस्ताद मध्ये चांगलेच भांडण झाल्याचे दिसून येणार आहे. पुष्कर दुसऱ्या टीम वर प्रंचड चिडणार असून तो आरोप देखील करणार आहे कि, जाणून बुजून ही टीम एकाच खेळण्याला थकवायचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे आस्ताद आणि पुष्कर मध्ये वाद रंगणार आहे. पुष्करने स्मिता आणि टीम मधील सदस्यांना वारंवार माणुसकी नसल्याचे म्हंटल्याने स्मिता पुष्करला धमकी देणार आहे कि, पुन्हा असं बोलास तर ‘लाथ मारेन” ज्यावर पुष्कर आणि स्मिता मध्ये बरीच बाचाबाची होणार आहे. दुसरीकडे मेघा रेशमला कार्यामध्ये “मुकी परी” असे म्हणार आहे कारण, रेशम मेघाशी बोलत नाहीये. जुई आणि स्मितामध्ये देखील टास्क करत असताना वादावादी झाल्याचे बघायला मिळणार आहे.
आता ही भांडणं कोणत्या टोकाला जातील ? कोणती टीम विजयी होईल ? आज बनलेले चिल्लर पार्टी आणि त्यांचे नखरे खेळणी बनलेल्या सदस्यांना किती बेहाल करून सोडणार आहेत हे प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू आजचा बिग बॉस मराठीचा भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.