बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण आहेत दाभोळकर, साळुंखे, डिसुझा ?

मुंबई ५ मे२०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रहाणारे रहिवाशी आता गेले ५० दिवसांपासून रहात आहेत. कुठल्याही प्रकारची बाहेरच्या विश्वातील माहिती त्यांच्या पर्यंत पोहचत नाहीइतक्या दिवसांपासून त्यांचा बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीशी संपर्क नाही. त्यामुळे २४ तास ते घरातील सदस्यांशी बोलतात, भांडतात, भावना व्यक्त करतात. घरामध्ये करमणुकीचे कुठलेही साधन नाही, त्यामुळे घरातील सदस्य रोज काही ना काही करमणुकीचे साधन शोधत असतात. अश्यातच एक साधन म्हणजे या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेले कॅमेरा जे सदस्यांवर २४ तास नजर ठेऊन असतात. जणू हे सदस्य त्यांच्या नजरकैदेतच आहेत. जुई गडकरी या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली. तिने यावेळेस बऱ्याच भावना व्यक्त केल्या, काही गोष्टी देखील सांगितल्या.
जुईने सांगितले कि, या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मी १५ वेगळ्या स्वभावाच्या माणसांबरोबर राहिले आता मी माणसांमध्ये राहू शकते, पहिले मला माणसांपेक्षा प्राणी आवडायचेमी प्राणी प्रेमी आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राहून आल्यावर मी पहिल्यापेक्षा जास्त शांत झाले आहे जगणं आवडू लागले आहे असे मी म्हणेन. बिग बॉस मराठीच्या घराबद्दल सांगायच तर आम्ही घरातील कॅमेरांना वेगवेगळी नावे ठेवली होती, कारण आम्ही जेंव्हा त्यांच्याशी बोलायचो तेंव्हा ते आमच्याकडे बघायचे,PAN, Focus, झूम करायचे त्यामुळे छान वाटायचे. दाभोळकरसाळुंखे, डिसुजा, कधी काका – काकू असे देखील आम्ही त्यांना प्रमाने म्हणायचो असे तिने सांगितले. 

Subscribe to receive free email updates: