या प्रोमोमध्ये सुयश दोन वेगवेगळ्या पोशाखा मध्ये दिसत आहे. एका पोशाखमध्ये म्हणजेच मालिकेमधील समीरचा ड्रेस कोड अगदीच आजच्या तरुण पिढीशी साधर्म्य साधणारा आहे. त्याने टीशर्ट, जीन्स, शर्ट आणि शूज असे घातले आहे. सुयशचा हा लुक सध्या ट्रेंड मध्ये देखील आहे. गंमत त्याच्या दुसऱ्या पोशाखात आहे. म्हणजेच मालिकेतील रणविजय हा राजघराण्यातील आहे असे समजते त्यामुळे त्याने शेरवानी,मोजडी, चष्मा असा पोशाख घातला आहे. सुयशच्या या दोन वेगळ्या लुक्समुळे प्रेक्षकांना संभ्रमात टाकले आहे हे नक्की.
या लुकवर बोलताना सुयश म्हणाला, “ह्या मालिकेत पहील्यांदाच मला दोन पात्र करायची संधी मिळाली आहे आणि दोन्ही भूमिका करताना फारंच मज्जा आणि शिकायला मिळतंय. लूक्सच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही पात्र आजच्या जगातली असली तरी आमच्या लेखकाच्या (चिनमय मांडलेकर) यांना दोन पात्र पुर्ण वेगळी वाटली पाहीजेत अस वाटत होतं. समीर हा बॉय नेक्स्ट डोअर तरूणाई पैकी कोणालाही रिलेट होईल असा पाहीजे. इंजिनिअर असला तरी कॅस्यूअल कपडे जिन्स घालणारा. पण त्या उलट रणविजय आहे. व्यवस्थित टापटीप कपडे, शिस्त असलेला व राजघराण्याचा असल्याने त्याच्या दिसण्यात सुद्घा एक आदब आहे. समीर चा लूक करायला फार कष्ट पडत नाहीत. केसातून हात फिरवले की समीर तयार. पण रणविजय च्या लूक ला खूप कष्ट करावे लागतात कपडे व मॅचिंग दागिन्यांचे वेगळे संच आहेत शेरवानी विशिष्ट प्रकारची मोजड्या... केस सेट करायला तर एक विशिष्ट प्रकारचं वॅक्स लावून ते सेट करावे लागतात. काही वेळा तर लागोपाठ दोन्ही लुक्स करावे लागतात. इतकेच नव्हे तर त्याच्या डोळ्याचा वेगळा मेकअप करावा लागतो. त्याच्या लूक साठी तयार होतानाच हळू हळू त्याच्या शिस्तीचा अनुभव यायला लागतो.कलर्स मराठी च्या टीम चा ह्या लूक्स मध्ये मोठा वाटा आहे. वेगवेगळे रेफरन्स काढून अनेक वेळा लुक टेस्ट करून एक महिनाभर ह्या लुक्सवर काम सुरु होतं. मी असे दोन्ही लूक्स एकाचं वेळी करू शकतो हा सगळ्या टीम चा विश्वास मला खूप महत्वाचा वाटतो. हेअर स्टायलिस्ट अरुण(बंधू)चव्हाण, वेशभूषा (काॅस्ट्यूम्स) पौर्णिमा ओक, रंगभूषा (मेकअप) संदीप ह्या सगळ्यांमुळे ही दोन कॅरॅक्टर करायला मज्जा येते आणि याच श्रेय देखील यांना जात.
“सख्या रे” च्या प्रोमोजमधून मालिका खूपच interesting असणार आहे हे नक्की. पण समीर आणि रणविजय बद्दल प्रेक्षकांच्या मनात असलेले बरेच प्रश्न लवकरच दूर होणार आहेत. सुयशला एका वेगळ्या लुक मध्ये बघायला नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.