दूरसंचार खाते (डीओटी), संवाद मंत्रालयाने विद्यूतचुंबकीय क्षेत्र उत्सर्जन (इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (ईएमएफ) एमिशन) आणि मोबाइल टॉवर्स या विषयावर आधारित जागरूकता कार्यक्रम संपन्न


मुंबई मार्च २०१७ – दूरसंचार खाते (डीओटी), संवाद मंत्रालयाने विद्यातचुंबकीय क्षेत्र उत्सर्जन (इलेक्ट्रोमॅग्नेटिकफील्ड (ईएमएफएमिशनआणि मोबाइल टॉवर्स या विषयावर आधारित जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होतेईएफएम उत्सर्जनाविषयी नागरिकांमध्ये असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आणि वैज्ञानिकपुराव्यांच्या मदतीने निराधार भीती दूर करण्यासाठी देशभरात असे कार्यक्रम घेतले जाणार आहेतश्रीसुबोधसक्सेनासंचालक (टर्मडीओटी), मुंबई यांनी स्वागतपर भाषण केले आणि राज्यभरातील मोबाइल कनेक्टिव्हिटीचेमहत्तव विशद केले तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याची तसेच मुंबईच्या विकासासाठी सर्वसामान्य जनता,सरकार आणि उद्योगक्षेत्र यांच्यात परस्परसहकार्य असण्याची गरज व्यक्त केली.
श्री. रवी गोयल, डीडीजी टर्म मुंबई, श्री. सी. पी. सामंत, डीडीजी टर्म, मुंबई, श्री. हरी नारायण, संचालक टर्म, मुंबई आणि डॉक्टर दिलिप पवारप्रसिद्ध क्लिनिकल फार्माकोलॉजिस्ट यांनी यावेळेस वक्ते म्हणून उपस्थित राहूनकार्यक्रमाची शान  वाढवलीराज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारीनामवंत मंडळी आणि जनतेचे प्रतिनिधीही यावेळेसउपस्थित होतेदूरसंचार अधिकारी आणि डॉक्टरांचा समावेश असलेल्या एका मंडळाने मोबाइल टॉवरकिरणोत्सर्गामुळे आरोग्याला संभवणाऱ्या धोक्यांविषयी वैज्ञानिक माहिती देत विविध गैरसमज दूर केले.
तांत्रिक माहितीपर भाषण देताना श्रीसीपीसामंतडीडीजी टर्ममुंबई यांनीमोबाइल टॉवरमधून होणाराइंटरनॅशनल कमिशन ऑन नॉनआयोनायझिंग रेडिएशन प्रोटेक्शनने (आयसीएनआयआरपीसांगितलेल्या सुरक्षितमर्यादेच्या खाली असलेला आणि जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेला ईएमफ किरणोत्सर्ग आरोग्यावरघातक परिणाम करू शकतोदूरसंचार मंत्रालयाने रेडिओ फ्रिक्वेन्सी फील्डच्या (बेस स्टेशन एमिशन्ससंसर्गपातळीवर यापूर्वीच अतिशय कडक मर्यादा घातली असून ती आयसीएनआयआरपीने घालून दिलेल्या आणि जागतिकआरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा दहा पटींनी जास्त कडक आहे, असे सांगितलेविकसित देशांमध्येपाळल्या जाणाऱ्या मर्यादांपेक्षाही आपल्या देशातील ईएमएफ मर्यादा अतिशय कडक आहेतत्याशिवाय भारतसरकारने दूरसंचार सेवा पुरवठादार या मर्यादांचे पालन करतात की नाही हे पाहाण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यरतकेली आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
श्री. रवी गोयल, डीडीजी टर्ममुंबई यांनी जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या तीस वर्षांत जगभरात करण्यातआलेल्या अंदाजे २५ हजार अभ्यास अहवालांचा आणि सखोल वैज्ञानिक साहित्याचा संदर्भ घेतल्याकडे लक्ष वेधलेतेम्हणालेकाही लोकांना या क्षेत्रात आणखी संशोधन व्हावे असे वाटत आहेमात्र या क्षेत्रातील वैज्ञानिक माहितीबहुतांश रसायनांपेक्षा जास्त विस्तृत आहेसध्या कमी पातळीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्रांमुळे आरोग्याला कोणत्याहीप्रकारचा धोका होत असल्याचा पुरावा सध्या मिळालेला नाही.

डॉदिलिप पवारप्रसिद्ध क्लिनिकल फार्माकोलॉजिस्ट यांनी जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या आणि ५०राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांचा  आठ आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग असलेल्या ईएमएफ प्रकल्पाचा संदर्भ दिलाते १९९६पासून एकत्रितपणे कमी पातळीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे आरोग्याला होऊ शकणाऱ्या संभाव्य धोक्याविषयीसामान्य जनतेला वैज्ञानिकदृष्ट्या सबळ उत्तरे देण्यासाठी विविध वैज्ञानिक माहितीचे विश्लेषण करत आहे.आजपर्यंत विस्तृत संशोधन होऊनही कमी पातळीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे आरोग्याला हानी पोहोचते याचापुरावा मिळालेला नाही.
श्री. हरी नारायण, संचालक टर्ममुंबई पुढे म्हणालेईएमएफसंदर्भातील नियम पालनांवर देखरेख करण्यासाठीकठोर अंमलबजावणी यंत्रणा तयार करण्यात आली आहे.जरएखादी बीटीएस साइट ईएमएफ नियमांचा भंग करतानादिसल्यास नियमभंगाच्या प्रत्येक घटनेसाठी बीटीएसला १० लाख रुपयांचा दंड केला जातो तसेच वारंवार नियमभंगझाल्यास बीटीएस साइट बंद केली जाते.  
दूरसंचार मंत्रालय (डीओटी)
डीओटी (डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनया नावाने ओळखले जाणारे दूरसंचार मंत्रालय संवाद मंत्रालयभारतसरकारची कार्यकारी शाखा आहेग्रामीण आणि दुर्गम भागावर विशेष लक्ष देत वेगवान आणि सुरक्षितअत्याधुनिक,विनाअडथळा नेटवर्क देऊन डिजिटल दरी सांधून त्याद्वारे सामाजिकआर्थिक विकास साधतदेशभरात परवडणारी उच्च दर्जाची ब्रॉडबँड सेवा पुरवून ज्ञानाधिष्ठित समाज तयार करतनागरिकांच्या सामाजिकआर्थिकसक्षमीकरणासाठी मोबाइल उपकरणाचा वापर करून भारताला दूरसंचार उपकरणे उत्पादन क्षेत्रातील मुख्य केंद्रबनवणे आणि राष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठीदेशांतर्गत  परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणिनोकऱ्यांच्या निर्मितीला चालना देण्याच्या ध्येयासाठी हे मंत्रालय काम करत आहे.
टॉवरसंदर्भातील अधिका माहितीसाठीकृपया संपर्क
श्रीसुबोध सक्सेनासंचालक (टर्म), डीओटी
संपर्क022-28573973

Subscribe to receive free email updates: