भैरवकर वाड्यावर बऱ्याच गोष्टी घडत असतानाच, देविका वाडा सोडून गेली. विद्युल आणि भुजंग यांना वाड्याच्या कागदपत्रांवर दुर्गाची स्वाक्षरी हवी असल्याने या दोघांनी दुर्गाला भैरवकर वाड्यावर आणले. याचदरम्यान, दुर्गाला सरस्वतीबद्दल सगळी माहिती हळूहळू मिळू लागली. सरस्वती कशी होती, तिचा स्वभाव कसा होता, तिचं आणि राघवचं नातं कसं होतं हे सगळं दुर्गाला कळत. त्याचबरोबर दुर्गाला विद्युल आणि भुजंग यांच्या कारस्थानाबद्दल देखील सुगावा लागतो. ती या दोघांच्या कुठल्याही म्हणण्यामध्ये येत नाही, कुठलही कामं ऐकत नाही आणि यामुळेच भुजंग आणि विद्युल तिला मारण्याचा कट रचतात. हे सुरु असतानाच वाड्यावर दुर्गाच्या अक्का येतात. आता अक्का आणि दुर्गा मिळून वाड्यामध्ये काय करतील ? कसा विद्युल आणि भुजंग यांचा कट उधळून लावतील हे बघण्यासारखे असणार आहे.
मालिकेमध्ये इतक्या घटना घडत असताना राघवची सरू परतणार आहे. सरस्वती एका वेगळ्याच रुपात मालिकेमध्ये परतणार आहे. सरस्वती आता एका नव्या कुटुंबासोबत रहात आहे. त्या घरामध्ये एक छकुली आहे, तिचे वडील आहेत. या लहान छकुलीची भूमिका गार्गी जोशी साकारणार आहे. सरस्वती मालिकेमध्ये परतण्याने काय घडेल ? या नव्या घरामध्ये ती कशी पोहचली ? तिला कोणी वाचवलं ? सरस्वती बरोबर या काही महिन्यांमध्ये काय घडलं ? दुर्गा आणि सरस्वती एकच आहेत का ? राघव आणि सरस्वती पुन्हा एकत्र येतील का ? मालिकेला कुठलं नवं वळण मिळेल ? हे जाणून घेण्यासाठी बघा “सरस्वती” सोम ते शनि संध्या. ७ वा. फक्त कलर्स मराठीवर.