या मालिकेतील सर्वच कलाकारांनी १०० एपिसोड पूर्ण झाल्यामुळे मोठया उत्साहात सेटवर केक कापला, कलाकारांना झालेला आनंद त्यांच्या सेल्फीमधून दिसतो आहे. मालिकेचा नायक आणि आपल्या सगळ्यांचाच लाडका चिन्मय उदगीरकर याने सेटवर स्पेशली केक आणला आणि तो मालिकेच्या सगळ्या टेक्नीकल टीमकडून कट करून घेतला, हे खरोखच कौतुकास्पद आहे. केक कट करताना मालिकेचे शीर्षक गीत सगळ्यांनी मिळून म्हंटले.
यावर बोलताना चिन्मयने सांगितले, “घाडगे & सून मालिकेचे गेल्या दोन आठवड्यामध्ये सलग एका तासाचे भाग प्रक्षेपित झाले. ज्यामध्ये आमच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली. स्पॉट दादा, टेक्नीकल टीम, आमचे दिग्दर्शक या सगळ्यांनी हे शिवधनुष्य खूप छान पेलले. आम्ही कलाकार प्रेक्षकांना रोज भेटतो पण, हे पडद्यामागचे जे खरे कलाकार आहेत जे दिवस रात्र मेहेनत घेतात त्यांचे कौतुक, सत्कार हा झाला पाहिजे असं मला वाटले. त्यांना जेंव्हा कळालं कि आज आमचे १०० भाग पूर्ण झाले आहेत तेंव्हा त्यांना देखील खूप आनंद झाला. तसेही आम्ही आमच्या सेटवर सेलिब्रेशनचा एकही मोका सोडत नाही”.
घाडगे & सून मालिकेला तुम्ही असच प्रेम देत रहा आणि नक्की बघा सोम ते शनि रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.