राजा चित्रपटातून उलगडणार त्रिकोणी प्रेमकथा

प्रेम हा सिनेरसिकांइतकाच दिग्दर्शकांच्याही आवडीचा विषय. यामुळेच प्रेमावर आधारलेल्या सिनेमांची संख्या इतर सिनेमांच्या तुलनेत अधिक असून अशा सिनेमांना प्रेक्षकांचीही पसंती मिळत असते. राजा या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्ताने आजवर समोर न आलेले प्रेमातील नवे पैलू आपल्यासमोर येणार आहेत. दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून राजा या सिनेमाची कथा सादर केली आहे. नवोदित अभिनेता सौरदीप कुमार या सिनेमात शीर्षक भूमिकेत असूनस्वरदा जोशी आणि निशिता पुरंदरे राजाद्वारे प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत.येत्या २५ मे ला ‘राजा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निर्माते प्रवीण काकड यांनी ‘सत्यसाई मल्टिमिडीया प्रा. लि.’ या संस्थेअंतर्गत राजा चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शनासोबतच सिनेमाच्या लेखनाची जबाबदारीही शशिकांत देशपांडे यांनी सांभाळली आहे. राजा या सिनेमाची कथा एका पॅाप सिंगरच्या जीवनावर आधारित आहे. नैसर्गिक आवाजाची सुरेल देणगी लाभलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाचा पॉप सिंगर बनण्याचा प्रवास या सिनेमात आहे. देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून राजाची कथा सादर केली आहे. राजाच्या जीवनात येणाऱ्या दोन्ही नायिका त्याला त्याच्या प्रवासात यथोचित साथ देतात. यापैकी एक असते राधातर दुसरी मीरा. यानिमित्ताने जणू आधुनिक युगातील राधा-मीराची प्रेमकथाही समोर येणार आहे. गायक बनण्यासाठी स्ट्रगल करणारा राजा नेमका कोणावर प्रेम करत असतो? ते सिनेमा पाहिल्यावरच समजेल.
उत्कंठावर्धक कथानक ही या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू असल्याचं दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांचं म्हणणं आहे. राजाच्या जीवनात येणारे चढ-उतार प्रेक्षकांना स्वत:च्या जीवनातील स्ट्रगलशी जोडण्यात यशस्वी होतील आणि हेच या सिनेमाचं सर्वात मोठं यश असेल असं देशपांडे यांचं म्हणणं आहे. या सिनेमात एका गायकाचा प्रवास असल्याने देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेला सुमधूर संगीताची जोड देत राजाचा प्रवास संगीतमय बनवला आहे. नवोदित अभिनेता सौरदीप कुमार स्वरदा जोशी आणि निशिता पुरंदरे याखेरीज शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, राजेश भोसले, सुरेखा कुडचीविनीत बोंडेमिलिंद इनामदार, पौरस आदी कलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत.
२५ मे ला ‘राजा’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Subscribe to receive free email updates: