कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस !


  • मेघा आणि स्मिता मध्ये का झाला वाद !
  • रेशमने उषाजींना विचारला जाब ...
  • घरातील सदस्यांना बिग बॉस देणार एक आगळावेगळा टास्क...
 
मुंबई ३ मे२०१८ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चोर पोलीस हा खेळ ररंगला. लहानपणी आपण वेगवेगळे खेळ खेळले पण हा उत्कंठावर्धक खेळ आपण गंमत म्हणून खेळला असला तरी आता या घरामध्ये मात्र या खेळामुळे अनेक निर्णय घेण्यात येणार आहेत याची पूर्वकल्पना बिग बॉसने स्पर्धकांना दिली होती. या खेळा दरम्यान झालेल्या काही गोष्टींमुळे मेघा आणि स्मिता मध्ये भांडण होणार आहे. ज्याचे कारण प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये कळेलच. बिग बॉसच्या घरामध्ये काल चोर पोलीसचा खेळ बराच वेळ रंगला असून घरातील काही सदस्यांमध्ये म्हणजेच मेघा, उषाजी आणि रेशम मध्ये काही कारणांमुळे वाद होणार आहेत. ज्यामध्ये रेशमने उषाजींना बजावले आहे कि, मागून बोलण्यापेक्षा मला समोरून बोललेलं जास्त आवडेल ... या तिघांमध्ये झालेला हा वाद कुठल्या टोकापर्यंत गेला मेघा आणि स्मिता मध्ये वाद का झाला आणि बिग बॉसने देलेल्या टास्क मध्ये रहिवाश्यांना यश मिळेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या भागामध्ये मिळणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठीचा आजचा भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
आजच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरातील रहिवाश्यांना बिग बॉस गार्डन एरियामध्ये एका लाल रंगाच्या चौकटीमध्ये उभे रहाण्यास सांगणार असूनत्या चौकटी बाहेर जाण्यास सदस्यांना सक्त मनाई आहे. लाल चौकट असलेली जागा सदस्यांच्या हक्काची असून उर्वरित घर त्यांच्यासाठी बंद रहणार आहे आणि दिवस अखेरपर्यंत घरावर सदस्यांना ताबा मिळवायचा आहे ... तसेच दिवसा अंती घराच्या ज्या भागावर सदस्यांचा ताबा नसेल ती जागा अनिश्चित कालावधी पर्यंत सदस्यांना वापरता येणार नाही असे देखील बिग बॉस सूचित करणार आहेत.
तेंव्हा आता घरामधील सदस्य कुठ कुठल्या जागेवर ताबा मिळवू शकतील हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठीचा आजचा भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: