Amids the current crisis of COVID 19 when everybody is in home , our brave technical staff is stepping out for broadcasting so that all the necessary information should go to the people. Media is currently bridge between government authorities and people, our engineers and technicians are it's fundamental.
Engineer Mr Sandip Ahirrao has also written a poem explaining the fear that corona virus has created.
इवलासा शब्द ही महाकाय वाटावा एवढ्या आकाराचा विषाणु तो
त्याने केले अवघे जग जणु स्तब्ध
मी मी म्हणणारे महाकाय शक्तिमान राष्ट्रेही
झाले त्यापुढे हतबल आणि निशब्द
परग्रहावरही ज्या मानवाने रोवला आपल्या बुद्धिमत्तेचा झेंडा
त्याला जणु वाकुल्या दाखवीत हसतो आहे
हा इवलासा गुंडा
मानवाच्या अपरंपार आकांक्षेला त्याने लावला असा काही करकचुन ब्रेक
बुद्धिबळाच्या पहिल्याच चालीत त्याने केले चेक आणि मेट
आपल्या कव्हेत विश्व आणू
कदाचीत ह्या उन्मत्त आविर्भावास लगाम घालायलाच अवतरला हा विषाणू
Source Namrata Falke, PEX