सरस्वती मालिकेमधील सरस्वतीचा बदलेला अंदाज ....

IMG_9744
IMG-20161223-WA0055
(New Look)                   (Old Look)
मुंबई२६ डिसेंबर,२०१६ : कलर्स मराठीवरील सरस्वती या मालिकमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या सरस्वतीचा एक वेगळाच लुक बघायला मिळणार आहे. तितिक्षा म्हणजेच सरस्वती हि समंजससाधीमनमिळावू आणि सगळ्यांना जीवापाड प्रेम करणारी आणि सगळ्यांना आपल्या मधुर बोलण्याने आपलसं करणारी अशी व्यक्तिरेखा साकारत आहे. सरस्वतीने आपल्या कामाने आणि वेगळ्याच प्रकारच्या बोलण्याच्या अंदाजाने प्रेक्षकांना आपलस केल आहे. तिच्या अक्टिंगपासून तिच्या मंगळसूत्रापर्यंत सगळेच प्रेक्षकांना खूप आवडत. मालिकेमध्ये सरस्वती आणि मोठ्या मालकांच लग्न झाल्यापासून सरस्वतीचे मंगळसूत्र खूपच फेमस झाले. कारणया मंगळसूत्रामध्ये असलेला वेगळेपणा लोकांना खूपच आवडला. आता सरस्वती मालिकेने तब्बल १ वर्ष पूर्ण केले आहे, प्रेक्षकांच अपार प्रेम अजूनही या मालिकेला मिळत आहे.

सरस्वती मालिकेमध्ये मोठ्या मालकांनी म्हणजेच राघवने सरस्वतीला सुंदर अश्या साड्या भेट म्हणून दिल्या आहेत. सारा घरी आल्यामुळे झालेल्या गैरसमजातून आणि सरस्वती आणि राघव मध्ये आलेला दुरावा दूर करण्यासाठी आणि सरस्वतीला मनविण्यासाठी राघव ज्या साड्या आणि
गळ्यातला नेकलेस सरस्वतीला भेट म्हणून देतो तोच आता सरस्वतीने घालायला सुरुवात केली आहे. या नवीन लुक मध्ये सरस्वती खूपच सुम्डे दिसते आहे यात शंका नाही. खात्री आहे प्रेक्षकांना देखील सरस्वतीचा हा लुक नक्कीच आवडेल.
तेंव्हा बघत रहा सरस्वती फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: