अस्से ५०० भाग सुरेख बाई... Assa Sasar Surekh Bai che 500 Bhaag purna

१३ फेब्रुवारीला पूर्ण होणार अस्सं सासर सुरेख बाईचे ५०० भाग
मुंबई८ फेब्रुवारी : नात्यात प्रेम आणि विश्वास असला की कुठेही नंदनवन फुलवता येतंया श्रद्धेने सुरु झालेली यश-जुईची प्रेमकहाणी येत्या १३ फेब्रुवारीला ५०० भागांचा टप्पा पूर्ण करत आहे. रसिक प्रेक्षकांनी यश-जुईला भरभरून प्रेम दिलंप्रेक्षकांच्या लाभलेल्या उदंड प्रतिसादामुळेच आज अस्सं सासर सुरेख बाई मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. येत्या १३ फेब्रुवारीला मालिकेचे ५०० भाग पूर्ण होत आहेत. 
चाळीतल्या या दहा बाय दहाच्या घराने गेल्या ५०० भागांत अनेक चढउतार पाहिलेयश-जुईची फुलणारी प्रीती पाहिलीघर आणि करिअर सांभाळतानाची तारेवरची कसरत पाहिली, गैरसमजातून झालेली भांडणं देखील पाहिलीपण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र कायम राहिली, ती म्हणजेकोणत्याही संकटाच्या वेळी जीवाला जीव देणारीआपुलकी जपणारी सुरेख सासरची सुरेख माणसं ! आपल्याच घरचीआपल्याच माणसांची वाटणारीनात्यांमधली आपुलकी जपणारी आपली ही आवडती मालिका आता ५०० भागांचा टप्पा पूर्ण करत आहे आणि यानंतर ही कहाणी अधिकच उत्कंठावर्धक वळणावर पोचणार आहे... काय आहे हे नवं वळणहे जाणून घेण्यासाठी पाहत राहाअस्सं सासर सुरेख बाई – सोमवार ते शनिवार रात्री 8.00 वाजता कलर्स मराठीवर !

Subscribe to receive free email updates: