यारी दोस्ती स्पेशल ‘फक्त मराठी’वर

मराठी सिनेसृष्टीत अनेक लोकप्रिय कलाकार जोड्यांची केमिस्ट्री नेहमीच एव्हरग्रीन ठरली. त्यांचे चित्रपट, त्यांची अदाकारी बघण्यासाठी रसिकांमध्ये नेहमीच उत्सुकता पहायला मिळते. अशाच सदाबहार जोडींच्या सुपरहिट सिनेमांचा नजराणा ‘फक्त मराठी’ वाहिनीने रसिकांसाठी आणला आहे. फेब्रुवारी महिन्यात ‘यारी दोस्ती स्पेशल’ चित्रपटांमध्ये दर शनिवारी रात्री ८:३० वा. प्रेक्षकांना असे लोकप्रिय चित्रपट पहाण्याची संधी मिळणार आहे.
फक्त मराठी’वर ‘बंडलबाज’, ‘गम्मत जम्मत’, ‘डम डम डिगा डिगा’, ‘सालीने केला घोटाळा’ हे फुल टू धमाल चित्रपट फेब्रुवारीत दर शनिवारी रात्री ८:३० वा. बघता येणार आहेत. अनेक गाजलेल्या चित्रपटांनी व चित्रपटविषयक कार्यक्रमांनी ‘फक्त मराठी’ वाहिनी आता चांगलीच रसिकमान्य झाली आहे. या धर्तीवर मराठीतील ख्यातनाम मैत्रीपूर्ण जोड्याचे गाजलेले चित्रपट दाखविण्यात येणार असून प्रेक्षकांच्या ते नक्कीच पसंतीस उतरतील. 

Subscribe to receive free email updates: