स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असणारा आणि स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित 'फुगे' या सिनेमाचा अंधेरी येथील पीव्हीआरमध्ये नुकताच ग्रांड प्रीमियर झाला. सचिन पिळगावकर,सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, सिद्धार्ध जाधव, अभिनय बेर्डे, भूषण प्रधान आणि दिग्दर्शक रवी जाधव यांसारख्या मराठी सिनेजगतातील चमचमत्या तारकांनी उपस्थिती लावली होती , तसेच हिंदीतील राकेश बापट, रिद्धिमा पंडित, अविका गौर, अंजनी सुखानी, सुनील पाल या कलाकारांनी तर प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद नेहलानी हे देखील 'फुगे'च्या रेड कार्पेटवर दिसून आले.