6 आकर्षक डस्टबीनसह व्हीएच 1 सुपरसोनिक 2017 झाले चकाचक
10 फेब्रुवारी 2017 : व्ही़एच 1 सुपरसोनिक 2017 च्या आगळ्यावेगळ्या म्युझिक फेस्टीव्हलविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. सुमारे 70 कलाकार या कार्यक्रमाची शोभा वाढवत असून एरिक प्रिल्झ,मॅकलीमोर आणि झेड असे नामवंत या कार्यक्रमात सहभागी होत असताना सर्व संगीतप्रेमींनी शहराकडे जोरदार कुच केली आहे.पहिल्या दिवशीच या फेस्टीव्हला पुणेकरांनी पसंतीची दाद दिली. मोठ्या संख्येने लोक येणार असल्याचे लक्षात घेऊन व्हीएच 1 सुपसोनिकच्या आयोजकांनी हाऊसकीपिंग स्टाफबरोबरच 50 डस्टबीन या कार्यक्रमाच्या ठिकाणी ठेवल्या आहेत.मात्र जिथे विविध प्रकारचे म्युझिक,प्ली मार्केट किंवा खाद्यपदार्थ आकर्षक असतात तिथे डस्टबीन देखील आकर्षक का असू नयेत ?