होंडाने केले नव्या अॅक्टिव्हा 4जीचे उद्घाटन

जगातील सर्वात जास्त विकली जाणारी दुचाकी, चौथ्या पिढीचे तंत्रज्ञान समाविष्ट*
*(बीएस-IV, एचओ, पुढील नवीन रचना आणि मोबाइल चार्जिंगसाठी सॉकेटची सोय)
नवालूक – पुढील कव्हर बदलणाऱ्या नव्या रचनेत
नवीन रंग – दोन नवीन रंग सादर – मॅट सेलेन सिल्व्हर मेटॅलिक आणि मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक
नवीन वैशिष्ट्ये – मोबाइल चार्ज करण्यासाठी सॉकेटची सोय आणि अधिक सुलभतेसाठी पुढचा हूक मागे घेता येईल अशी सोय
अधिक सुरक्षा – सर्व प्रकारच्या परिस्थितीत दृष्यमानता सुधारावी यासाठी स्वयंचलित हेडलँप (एएचओ)
बीएस IV – होंडा अॅक्टिव्हाचे विश्वासार्ह 110 सीसीचे एचइटी इंजिन आता भारत स्टेज – IV सहत्वासह
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2017 : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लिमिटेड (एमएमएसआय)तर्फे आज चौथ्या पिढीच्या सुधारीत आयकॉनिक 110 सीसीच्या स्वयंचलित अॅक्टिव्हा 4जी – या जगातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या स्कूटरचे नव्या बीएस IV आणि एएचओ मान्यतेसह उद्घाटन करण्यात आले आहे.
होंडाने प्रथम सादर केलेल्या 110 सीसीच्या स्वयंचलित स्कूटर या भारतीय दुचाकी उद्योगक्षेत्र प्रकारातील सर्वात जलद गतीने वाढणाऱ्या स्कूटर ठरल्या आहेत. आणि दुचाकी चालवायची म्हणजेच होंडाची दुचाकी हा ट्रेंडच तयार झाला आहे, स्वयंचलित स्कूटर प्रकारात बाजारपेठेतील तब्बल 58 टक्के भाग या दुचाकीने व्यापलेले आहेत.
नव्या सादरीकरणाबाबत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लिमिटेडचे विक्री आणि वितरण विभागाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले की,``तब्बल दीड कोटी भारतीय कुटुंबांच्या विश्वासासह होंडाची आयकॉनिक अॅक्टिव्हा ही केवळ भारतातीलच नाही तर 2016 सालातील जगातील सर्वाधिक विक्री करणारी दुचाकी ठरली आहे. चौथ्या पिढीची बीएस-IVच्या नव्या सुधारणेमुळे अॅक्टिव्हा 4जी ही कुटुंबांची सर्वाधिक लाडकी स्कूटर ठरणार आहे, ही नवी गाडी ग्राहकांना मोबाइल चार्ज करण्यासाठी सॉकेट सुविधाही देणार आहे, तसेच ती दोन नव्या रंगांत उपलब्ध आहे.''
जगात क्रमांक एकची विक्री होणारी दुचारी नवीअॅक्टिव्हा 4जी आता नव्या लूकमध्ये आणि नव्या वैशिष्ट्यांसह सादर
बाजारपेठेत नवा उत्साह घेऊन येणारी अॅक्टिव्हा 4जीआता अधिक आकर्षक रुपात आणि पुढील कव्हर बदलणाऱ्या नव्या रचनेत सादर होत आहे.
तसेच मोबाइल चार्ज करण्यासाठी सॉकेट सुविधाही देण्यात येणार असून, ट्यूबलेस टायर, सीटखालील सामान ठेवण्याची जागा, गाडी चालवण्यासाठी आरामदायी सीट आणि सीएलआयसी यंत्रणा (सीएलआयसी किंवा सुलभ स्वतंत्र कव्हर यंत्रणा यामुळे गाडीची देखभाल अतिशय सोपी होते आणि ती वापरायलाही सुलभ वाटते.) यामुळे गाडी चालवण्याच्या अनुभवात अधिक भरच पडते.
नवी अॅक्टिव्हा 4जी : तंत्रज्ञानात काळाच्या पुढे!
जगातील सर्वात जास्त प्रमाणात विक्री होणारी दुचाकी - नवीअॅक्टिव्हा 4जी ही काळाच्या पुढे आहे आणि इक्विलायझरसह कॉम्बी ब्रेक सिस्टम (सीबीएस) तंत्रज्ञानासह सज्ज आहे. (सरकारच्या नियंत्रणानुसार सीबीएस 125 सीसी इंजिन क्षमतेच्या दुचाकींना 1 एप्रिल 2018 पासून बंधनकारक असणार आहे.)
होंडाच्या अत्याधुनिक कॉम्बी ब्रेक यंत्रणेत (सीबीएस) अनोखे इक्विलायझरमुळे पुढून आलेला दाब रोखते आणि त्याच वेळेस डावीकडून दाबत रेअर व्हिल्स काम करतात. यामुळे ब्रेकिंगचे अंतर कमी होते आणि समतोल सुधारतो, या सुलभ ब्रेक यंत्रणेमुळे गाडी चालवण्याच्या आत्मविश्वासात वाढ होते.
होंडा अॅक्टिव्हा 4जी आचा एएचओ आणि बीएस-IV अशा दोन्ही मान्यतांसह सादर
नवीअॅक्टिव्हा 4जी : रस्त्यावरील कामगिरीत अगदी ओघवती
होंडाच्या अॅक्टिव्हाचा मुख्य गाभा म्हणजे 109 सीसीचे विश्वासार्ह होंडा इको तंत्रज्ञान (एचइटी). 80बीपीए@7500आरपीएम इतकी अगदी उत्तम अशी एकूण ऊर्जा आणिएनएम@5500आरपीएम टॉर्कद्वारे रस्त्यावर अतिशय ओघवती कामगिरी.
नवीअॅक्टिव्हा 4जी : रंग, विविधता आणि किंमत
नव्यामॅट सेलेन सिल्व्हर मेटॅलिक आणि नव्या मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक रंगात नवी गाडी सादर करण्यात आली आहे, तसेच ट्रान्स ब्लू मेटॅलिक, इम्पेरिअल रेड मेटॅलिक, ब्लॅक, पर्ल अमेंझिंग व्हाइट आणि मॅजेस्टीक ब्राउन मेटॅलिक असे सर्व सात रंग नव्याअॅक्टिव्हा 4जीमध्ये उपलब्ध आहेत.
सर्व नव्या अॅक्टिव्हा 4जी 50,730 रुपयांपासून (एक्स शोरूम, दिल्ली) उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधा :
public.relations@honda2wheelersindia.com –होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लिमिटेड

Subscribe to receive free email updates: