‘गजर कीर्तनाचा’ महिलादिन विशेष भाग

‘जे जे आपणासी ठावे ते ते लोकांशी सांगावे’ या उक्तीने  आज अनेक महिला कीर्तनकार आज टाळ-चिपळ्यांचा गजर करत निरुपणात रंगल्या आहेत. झी टॅाकीजवर सुरु असलेल्या ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमात महिला दिन विशेष भाग रंगणार आहे.
६ मार्च ते १२ मार्च दरम्यान रंगणाऱ्या या भागात सुप्रियाताई साठे याचं कीर्तन रंगणार आहे. दीप्ती भागवत व ऋतुजा बागवे याचं मधुर निवेदन, सुप्रियाताई साठे यांच्या ओघवत्या शैलीतील कीर्तनाचा आस्वाद सकाळी दरोरज सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत प्रेक्षकांना घेता येईल. महिला दिनाचे औचित्य साधत रंगणारा हा विशेष भाग प्रेक्षकांसाठी निश्चितच वेगळा ठरेल.

Subscribe to receive free email updates: