मराठी रॅपर श्रेयश जाधव ची 'वीर मराठे' मधून शिवरायांना मानवंदना


'पुणे रॅप' च्या घवघवीत यशानंतर रॅपर श्रेयश जाधव पुन्हा एकदा एक नवेकोरे रॅपसॉंग प्रेक्षकांसमोर घेऊन येतो आहे. यावेळी त्याने शिवरायांवर आधारित 'वीर मराठे' हे हटके गाणे तयार केले आहे. १५ एप्रिल रोजी तिथीनुसार झालेल्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने या गाण्याचा पहिला टिजर पोस्टर रसिकांसाठी प्रदर्शित करण्यात आले.. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या स्तुतीपर गायेलेले हे पहिलेच रॅपसॉंग असून, या गाण्याद्वारे तो शिवरायांना मानवंदना देणार आहे.
एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली प्रसिद्ध होणारे 'वीर मराठा' या रॅप गाण्याला हर्ष, करण आणि अदित्य यांनी ताल दिला असून, सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन आणि कॉरियोग्राफी केली आहे या गाण्याचे बोल आणि रॅप स्वतः श्रेयश ने लिहिले आणि गायले आहे. प्रत्येक मराठी माणसाला स्फुरण देणारे 'वीर मराठे' हे रॅपसॉंग 'पुणे रॅप' इतकेच गाजेल यात शंका नाही.

Subscribe to receive free email updates: