लखलखत्या दुबईत बहरली सरस्वती – राघवची प्रीत


सरू आणि राघवचा विमानामध्ये ड्रीम सिक्वेन्स
राघवची मराठी पदार्थांची चव सरस्वतीने दुबईमध्ये देखील केली पूर्ण 
0P2A6587DUBAI 14
मुंबई १० मार्च २०१७ : कलर्स मराठीवरील सरस्वती ह्या प्रेक्षकांच्या लाडक्या मालीकेच कथानक आता एक नवीन वळण घेत आहे ... सध्या चर्चेत असलेली सरू – राघवची दुबई वारी प्रेक्षकांना लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. निळाशार समुद्रवाळूलखलखती दुबईनवीन जागा या बरोबरच या सगळ्यांमध्ये सरस्वती आणि राघवच प्रेम फुलणार आहे. लग्नानंतर सरू आणि राघव पहिल्यांदाच एकत्र बाहेर परदेशी  गेले असून हि ट्रीप नक्कीच या दोघांसाठी खूप महत्वाची असणार आहे. एका छोट्याश्या गावामध्ये राहणारी मुलगी आज परदेशी गेली हि बाब तिच्यासाठी वेगळीच आणि उत्सुकतेची आहे.
दुबई ट्रीपमध्ये सरस्वती प्रेक्षकांना वेगळ्या लुक मध्ये दिसणार आहे. सरस्वती पहिल्यांदाच विमानामध्ये बसणार याबाबत तिच्या मनात खूपच उत्सुकता आहे. विमानतळावर जाताना वा विमानमधून प्रवास  करताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायचीकुठल्या गोष्टी करू नये हे सगळच तिच्यासाठी खूपच नवीन असल्याकारणाने तिची कुठल्याप्रकारे धांदल उडणार आहे ती कुठला गोंधळ तर घालणार नाही ना या गोष्टी बघण खूपच मजेदार असणार आहे. प्रेक्षकांना विमानामधील एक ड्रीम सिक्वेन्स देखील बघायला मिळणार आहे ज्यामध्ये सरस्वती आणि राघव एक romantic डान्स केला आहे. तसेच दुबईला जाताना तिने नवऱ्यासाठी लोणची,चटण्या,चिवडा अश्या बऱ्याच गोष्टी घेऊन गेली आहे. यावरूनच तीच आपल्या नवऱ्यावरच प्रेम कळून येत. परदेशात गोष्टी खूप वेगळ्या असतातनवीन लोक असतात एक पण हे सगळ असताना दुबई ट्रीप हि सरू आणि राघवच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय ट्रीप असणार यात वाद नाही. आपला जोडीदार आपल्यासोबत आहे ज्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच्या बरोबर आपल्याला इतका वेळ एकांतात मिळणार आहे ही भावनाच मुळी सुखावणारी असते.
सरू आणि राघवने अविस्मरणीय क्षण दुबईमध्ये एकमेकांसोबत घालवले. दोघांनीही दुबईमधील निळाशार समुद्रवाळवंट आणि वाळूमध्ये खेळलेप्रेमाचे मोलाचे क्षण एकत्र घालवलेत्याचा मनसोक्त आनंद लुटला. तसेच दोघांनी दुबईचा फेरफटका तर मारलाच पण त्याबरोबर राघवने सरस्वतीला खूप खरेदी देखील करून दिली आणि सरस्वतीला खुश केले. दुबईमध्ये साईटसिंग देखील राघव आणि सरस्वतीने केलेआणि  याचदरम्यान राघव आणि सरस्वतीची चुकामुक झाली पण इतक्या मोठ्या शहरात सरस्वतीने राघवला शोधून काढले हे महत्वाचे. तसेच सरस्वतीला खुश ठेवण्याचा तसेच आपले तिच्यावरचे प्रेम व्यक्त करण्याची एकही
संधी राघवने दवडली नाही. राघवने सरस्वतीसाठी एक सुंदर romantic गाण देखील गायले आहेज्यामुळे सरस्वती खूप खुश झाली
पण याच ट्रीपमध्ये सरू आणि राघव बरोबर एक तिसरा व्यक्ती देखील आहे जो या दोघांचा  पाठलाग करतो आहे. तो तिसरा व्यक्ती म्हणजे सदाशिवजो सरस्वतीला मारण्याच्या हेतूने दुबईमध्ये गेला आहे,आणि सरस्वतीचा जीव धोक्यात आहे. त्यांची हि दुबई ट्रीप सुखरूप होईलसरुला मारण्याच्या हेतूमध्ये सदानंदला यश मिळेल कि खरोखरच सरस्वतीचा मृत्यू होईल सरू पहिल्यांदाच परदेशी जाणार आहे ते पण राघव बरोबर ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करते सरु आणि राघवच्या या सुखी संसाराला कोणाची नजर तर लागणार नाही ना राघव आणि सरू एकमेकांपासून दुरावले तर जाणार नाही ना हे सगळ बघण रंजक ठरणार आहे.
या सगळ्या घडामोडी बघण्यासाठी बघत रहा सरस्वती फक्त कलर्स मराठीवर २० ते २५ मार्च संध्या. ७.०० वा.

Subscribe to receive free email updates: