‘वन्स मोअर’ मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

वंशिका क्रिएशन सोबत सह निर्माते विष्णू मनोहर यांची निर्मिती असलेला मराठी चित्रपट वन्स मोअर चा मुहूर्त नुकताच पार पडला व चित्रपटाचे शूटिंग फिल्म सिटीगोरेगावमुंबई येथे सुरु झालेमुंबई सोबत गोव्यातही चित्रीकरण करण्यात येणार आहे.
वन्स मोअर हा मराठीतील पहिलाच सिनेमा आहे ज्यातजास्तीत जास्त वि एफ एक्स तसेच ग्राफिक्स वापरले जाणार आहे. वन्स मोअर हा चित्रपट मराठीतील बाहुबली होईल की कायअशी चर्चा फिल्म च्या मुहूर्तापासूनच फिल्म सृष्टीत सुरु झाली आहे. मराठीतील 2017 मधील सर्वात most awaited CINEMA  म्हणून वन्स मोअर चे नाव आता पासूनच घेतले जातेय. कारण हा सिनेमा 'कर्मया विषयावर भाष्य करणारा असल्याने, 14व्या शतकातील काळ व वर्तमान काळ दाखविला जाणार आहे. 
सदर सिनेमाची कथा कालाय तस्मय नमः प्रसिद्ध मालिकेच्या लेखिका फेम लेखिका श्वेता बिडकर यांनी लिहिले आहे. आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजविले अभिनेते नरेश बिडकर यांच्या खडतर मेहनतीने त्यांच्याच दिग्दर्शनात वन्स मोअर ची निर्मिती होत आहे. दिग्दर्शक म्हणून प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवून सिनेमाची शूटिंग सुरु करण्या अगोदरच संपूर्ण अभ्यास केला असल्याचे त्यांनी सांगितले. पिरियड फिल्म असल्याने छोट्या छोट्या गोष्टींची शहानिशा केल्या नंतरच आम्ही शूटिंग साठी येण्याचा माझा आग्रह होता,असे त्यांनी सांगितले. हजारो स्केचेस बनवूनत्यात परिपूर्णता आल्यानंतरच आम्ही प्रत्येक फ्रेम व प्रत्येक सिन हा शूट करण्या अगोदर कसा असेलत्याचा अभ्यास करूनच शूटिंग साठी रेडी झालो. या सिनेमाचे मोठे वशिष्ठ म्हणजे वन्स मोअर हा सिनेमा चे भरपूर शूट हे क्रोमा असणार आहे. मराठीतील कदाचित हा पहिलाच भव्य दिव्य व सहसिक प्रयत्न दिग्दर्शक नरेश बिडकर करीत आहेत.
'ती सध्या काय करतेच्या भव्य दिव्य व्यावसायिक यशस्वी सिनेमातून जसे अभिनय बेर्डे ने खुमासदार पदार्पण करून स्व लक्ष्मीकांत बेर्डे यांना मानवंदना दिलीतसेच वन्स मोअर द्वारे जेष्ठ संगीतकार ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रा ला आपल्या चालींनी वेळ लावलंय असे पं. अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष पत्की चे मराठी चित्रपट सृष्टीत मुख्य नायक म्हणून पदार्पण होत आहे. राजबिंडे असे रूप असणारा आशुतोष या सिनेमाद्वारे पदार्पण करीत असूनत्याला तेवढ्याच तोलामोलाची साथ देण्यासाठी आपल्या नृत्याने अवघ्या महाराष्ट्राची मन जिंकणारी अभिनेत्री व नृत्यांगना धनश्री पाटील सुद्धा या चित्रपटाद्वारे आपले पदार्पण करित आहे. वन्स मोअर चे अजून एक वशिष्ठ म्हणजे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या सिनेमाचे सह निर्माते असून त्यांची ही एक महत्वाची भूमिका या सिनेमात असणार आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे गेली अनेक वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हेदेशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अभिनयासाठी कौतुकास पात्र असणारी व घराघरात आई आजी संकल्पना रुजविणारी जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचाही अभिनयाची गोडी वन्स मोअर मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोबत अवघ्या महाराष्ट्राला आपल्या नुसत्या येण्यानेच हासाविणारा व अष्टपैलू विनोदवीर अभिनेता भारत गणेशपुरे यांच्याही अभिनयाचा आनंद यात आपल्याला चाखायला मिळणार आहे. सोबत पौर्णिमा तळवलकर व दिग्दर्शक नरेश बिडकर यांच्या हि या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत.
हे कमी कि काय म्हणून दिग्दर्शक नरेश बिडकर यांनी आपल्या वन्स मोअरच्या भव्य दिव्यतेसाठी जोधा अकबरचेन्नई एक्सप्रेस सारख्या बॉलिवूड पटांचे नृत्य दिग्दर्शक चिन्नी प्रकाश जी यांच्या कडे नृत्याची धुरा सोपविली आहे.
 वन्स मोअरला चित्रबद्ध करण्यासाठी तेवढ्याच तोडीचा छायाचित्रकार हवा असल्याने ती जबाबदारी दिग्दर्शक नरेश बिडकर यांनी हिंदी सिनेसृष्टीतील मातब्बर अश्या संजय सिंग यांना छाया दिग्दर्शनाची जबाबदारी दिली आहे.
या पिरियड फिल्म साठी संगीताची बाजू भक्कम पणे सांभळण्याचे शिव धनुष्य विविध पुरस्कार विजेते शैलेंद्र बर्वे यांनी लीलया पार पाडली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमांची तसेच दगडी चाळ सारख्या सुपर डुपर हिट सिनेमाच्या वेशभूषकार चैत्राली डोंगरे ह्यांच्यावर वेशभूषेची जबाबदारी आहे. वन्स मोअर चे संकलन अग्निपथदिल हैं कि मानता नही,सारख्या सुपर हिट सिनेमाचे संकलक डिंपी बहल करणार आहेत. तसेच पिरियड फिल्म च्या गरजा लक्षात घेऊन जेष्ठ कला दिग्दर्शक देवदास भंडारी यांना संपूर्ण जबाबदारी देऊन त्यांच्याही अनुभवाचा फायदा वन्स मोअर ला होईल असे दिग्दर्शक नरेश बिडकर सांगतात.

Subscribe to receive free email updates: