चिराग गेला रोडट्रिपला
‘वजनदार’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेला चिराग पाटील सध्या रोड ट्रीपला गेला आहे. त्याचा वाढदिवसानिमित्त या खास रोडट्रिपच आयोजन करण्यात आलं होतं. पंधरा दिवसासाठी चिराग ट्रिपला निघाला होता. नैनीताल, उदयपूर, जयपूर, जीम कॉरबेट नॅशनल पार्क, फतेहपूर, आग्रा अशा वेगवेगळ्या ठिकाणांना त्याने सध्या भेट दिली आहे. त्या ठिकाणाचे काही खास फोटोही त्याने सोशल मीडियावर अपलोड केले आहे. त्याने त्याचा हा वाढदिवस अगदी हटके पद्धतीने सेलिब्रेट करायला सुरवात केली आणि हा वाढदिवस निश्चितच चिरागसाठी अविस्मरणीय राहिला असेल यात शंकाच नाही.