विक्रम गोखले, अनिकेत विश्वासराव आणि प्रियांका यादव सादर करणार डॉक्टरांच्या वेदना
डॉक्टर म्हणजे माणसातला देव! असे म्हंटले जाते. पण हा देव सध्या पायदळी तसेच लाथाबुक्क्यांनी तुडवला जातोय. माणसातल्या या देवाकडून काही चूक होताच कामा नये असा अट्टाहास लोकांचा असतो. आणि त्यामुळेच काही बरे वाईट झाले, तर ह्याच देवाला मारायला देखील लोक धजावत नाही. अश्या या पेशंटच्या नातेवाईकांचा रोष पत्करणाऱ्या, आणि नेहमीच दडपणाखाली वावरणाऱ्या आजच्या डॉक्टरांची कैफियत मांडणारा 'चुकलंच जरा डॉक्टर होऊन' हे गाणे लवकरच आपल्यासमोर येत आहे. विक्टरी व्हिजन बॅनरखाली अभिनेत्री प्रियांका यादव निर्मित 'चुकलंच जरा डॉक्टर होऊन' हे गाणे डॉक्टरांच्या मानसिकतेचा वेध घेते.
डॉक्टरांना सतत आव्हानाला सामोरे जावे लागत असते, रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी ते नेहमीच आपल्या जीवाचे रान करत असतात. त्यामुळे उपचारादरम्यान काही बरे वाईट झाल्यास, डॉक्टरांना मारहाण करणे योग्य नाही, असा संवेदनशील संदेश हे गाणे लोकांना देते. ह्या गाण्यात अनिकेत विश्वासराव आणि प्रियांका यादव तसेच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी डॉक्टरांच्या भूमिका केल्या असून, डॉक्टरांचे भावविश्व मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी यात केला आहे. शिवाय अरुण पटवर्धन, संतोष मानकर हे कलाकार देखील यात असणार आहे.
विशेष म्हणजे या गाण्यात वास्तविकता दाखविण्यात आली आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत ख-या डॉक्टरांचा समावेश करण्यात आला असल्यामुळे या गाण्याला जिवंतपणा लाभला आहे.
प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित 'चुकलंच जरा डॉक्टर होऊन' ह्या गाण्याचे रोहन पटेल यांनी संगीत दिग्दर्शन केले असून, सुरेश वाडकर, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि वैशाली सामंत या गोड गळ्यांच्या गायकाचा आवाज त्याला लाभला आहे. डॉक्टरांची बाजू मांडणाऱ्या या गाण्याचे बोल काही डॉक्टरांनीच लिहिले आहेत. डॉ. स्वप्नील मानकर, डॉ. सुनंदा धीवरे अशी त्यांची नावे असून अविनाश घोडके यांनी देखील हे गाणे शब्दबद्ध करण्यात त्यांना सहाय्य केले आहे. अमोल माने यांनी संकलित केलेल्या या गाण्याचे छायाचित्रण मौलादास गुप्ता यांनी केले असून, कलादिग्दर्शक गिरीश कोळपकर यांनी ते अधिक सुंदर बनवले आहे. तसेच 'चुकलंच जरा डॉक्टर होऊन' या गाण्याच्या कार्यकारी निर्मात्याची धुरा प्रमोद मोहिते यांनी संभाळली आहे.
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मनोवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे, आणि त्यासाठीच डॉक्टरांच्या बाजूने विचार करण्यास भाग पाडणारे हे गाणे प्रेक्षकांना भावूक करून सोडेल अशी आशा आहे.
Vikram Gokhale, a lot of pain, the doctor will perform Vishvasrao and Priyanka Yadav
Manasatala doctor is God! It is said. But he also currently under lathabukkyanni to say goodbye. Manasatalya attahasa is that people should not become a mistake or God. And that some were good and evil, but also the same people who do not dare to kill him. At the patient's relatives patkaranarya resentment, and always under pressure and just sat in the doctor's doctors explained titled 'cukalanca' song is coming for us soon. Victory Vision banner Priyanka Yadav created 'by the doctor takes a little hit' song of the psychology of the doctor cukalanca.
The doctor is facing constant challenge, to always save patients lives are not greatly your life. So if anything good is bad treatment, the right not to be assaulted by a doctor, this song gives people the message that sensitive. This song a lot Vishvasrao and Priyanka Yadav and veteran actor Vikram Gokhale has in their sincere efforts to put forward, and the role of doctors Doctor goal. And Arun Patwardhan, assuming the satisfaction of the artist is also going to be in it.
Interestingly, the song is actually obtained. The attack was to protest the inclusion of this rally doctor removed the song has a vitality.
Directed by Paul King karale 'cukalanca around the doctor' this song Rohan Patel has been music director, Suresh Wadkar, Dr. Vaishali Samant and Shinde progress galyam the sweet voice of the singer is blessed him. Doctors have written some side doktarannica song lyrics or pro. DR. Assuming Swapnil, Dr. The names of Sunanda fishers have also been documented to assist them in this song Avinash Ghodke. Amol Mane has been compiled by the song Photography mauladasa Gupta, art director Gus Powered by it's made more beautiful. And 'cukalanca little doctor and this song's executive producer responsibility Pramod Mohite is guarded.
It is important to check that attitude assaulted the doctor, and therefore forced to think along these doctors hope that the song makes the sentimental audience.