‘बालपण देगा देवा मध्ये’ अंधश्रध्देविरोधात आनंदीचे पहिले पाउल !

मुंबई २१ जून२०१७ : बालपण देगा देवा मालिका नुकतीच कलर्स मराठीवर सुरु झाली आहे. मालिकेमध्ये  अण्णा यांची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी आपल्या दमदार अभिनयाने तसेच आनंदीचआणि मैथिली हिने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळविण्यास सुरुवात केली आहे. वेगळ्या धाटणीची संकल्पना प्रेक्षकांना या मालिकेतून बघायला मिळणार आहे. आनंदीचे निरागस प्रश्नतिची हुशारी आणि चौकसता मालिकेमध्ये अनेक प्रश्न सोडवेल आणि प्रेक्षकांना अनेक प्रश्न स्वत:ला विचारण्यास भाग पाडेल यात शंका नाही. बऱ्याच वर्षांपासून बळी देण्याची प्रथा आपल्या समाजात आहे जी अत्यंत अमानुष आहे एखाद्या प्राण्याचापक्ष्याचा वा माणसाचा बळी दिला कि अमुक गोष्ट होते असा समज आहे. बऱ्याच लोकांनी या प्रथेविरोधात आवाज देखील उठवला पणअजूनहि हि प्रथा अस्तित्वात आहे. पणयाच प्रथे विरोधात ‘बालपण देगा देवा’ मधील चिमुकली आनंदी आवाज उठवणार आहे.
श्रध्दा जर डोळस असेल तर माणसाच्या जगण्याला आधार देते. माणूस श्रद्धेच्या बळावर अनेक अडचणींवर मात करू शकतो. पण अंधश्रध्दा माणसाचा घात देखील करू शकते त्यामुळे तिला वेळीच मिटवणे गरजचे असते. पाण्याची समस्यापाउस कमी पडणे या समस्या महाराष्ट्रातील माणसाला माहिती नाही असे नाही. त्यामुळे गावामध्ये पाउस पडवापाण्याची टंचाई भासू नये अशी प्रत्येक गावकऱ्याची अपेक्षा असते. आनंदी राहत असलेल्या गावामध्ये राहणाऱ्या गावकरयांची देखील अशी आशा आहे. कारण गावामध्ये पाण्याची टंचाई आहेपाउस देखील कमी पडतो त्यामुळे गावामध्येच राहणारा बिर्जे नावाच्या माणसाने देवाला सांगितले आहे कि यावर्षी पाउस पडू देऊ मी कोकरुचा बळी देईन. पाउस पडवा म्हणून बिर्जे कोकरूचा बळी देणार आहेहि गोष्ट संपूर्ण गावा मध्ये कळतेअण्णाच्या कानावर देखील हि बाब येते त्यांना या गोष्टीचा खूप राग येतो. गावामधलाच एक मुलगा जो आनंदीचा देखील मित्र आहे तो तिला हि गोष्ट सांगतो. आनंदीला हि गोष्ट चुकीची वाटते आणि सोनूच्या मदतीने ती त्या निष्पाप कोकरूचा जीव वाचवते. बिर्जेला आनंदी आणि अण्णा हे समजवून सांगतात किएका निष्पाप जीवाचा बळी देऊन हे सगळ साध्य खरच होईल अस तुला वाटत काहे चुकीच आहे. बिर्जेला त्याची चूक कळते किएका जीवाचा बळी देणे हे चुकीचे आहे.
‘बालपण देगा देवा’ या मालिकेमधून समाजाला एक महत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे किएका मुक्या प्राण्याचा जीव घेऊन काहीच साध्य होतं नसते. 

Subscribe to receive free email updates:

Related Posts :