“बालपण देगा देवा” मध्ये आनंदी बनणार देवी

मुंबई २०जून २०१७ : बालपण देगा देवा मालिका नुकतीच कलर्स मराठीवर सुरु झाली आहे. मालिकेमध्ये अण्णा यांची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी आपल्या दमदार आणि आनंदी म्हणजेच मैथिली हिने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळविण्यास सुरुवात केली आहे. वेगळ्या धाटणीची संकल्पना प्रेक्षकांना या मालिकेतून बघायला मिळत आहे. आनंदीचे निरागस प्रश्नतिची हुशारी आणि चौकसता मालिकेमध्ये अनेक प्रश्न सोडवेल आणि प्रेक्षकांना अनेक प्रश्न स्वत:ला विचारण्यास भाग पाडेल यात शंका नाही. या आठवड्यामध्ये मालिकेमध्ये प्रेक्षकांना “दशावतार” बघायला मिळणार आहे. या विशेष भागामध्ये आनंदी देवी बनणार आहे आणि मग पुढे काय होईल हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे.
गावामध्ये उत्सव साजरा होणार आहेत्यामुळे मदन गावातील लहान मुलांचं नाटक बसवत आहे ज्यामध्ये तो सूत्रधाराची भूमिका वठवणार आहे. शारदा आनंदीचे नाव सुचवते आणि आनंदीदेखील देवी बनण्यास तयारी दाखवते. आनंदी देवीचा रोल नाटकामध्ये करण्यास खूपच उत्सुक आहेपण अण्णा गावामध्ये नसल्याकारणाने आनंदी त्यांना फोन करून तुम्ही नाटक बघायला या असं सांगते. नाटकामध्ये आनंदी देवीचा रोल छान प्रकारे पार पाडते. महिषासुराचा वध करतेतिथे जमलेले गावकरी आनंदीची आरती करत असतानाच अण्णा गावामध्ये येतात आणि हे सगळं बघतात. आपलं इतक सगळे छान कौतुक करत आहेतआपल्याला शाबासकी देत आहेत पण अण्णा मात्र आपल्याला काहीच बोलले नाही हे बघून आनंदी दु:खी होते. पणअण्णाच्या मनामध्ये एकावेगळ्याच गोष्टीची चिंता आहे, “या सगळ्या प्रकारामध्ये आनंदीचे बालपण तर हरवणार नाही ना कारण पहिले वाड्यामधील देवीचा चेहरा आणि आनंदीच्या चेहऱ्यामधील साम्य आणि आता आनंदीची पूजा यामुळे अण्णा अजूनच चिंतेत आहेत. पण आनंदीचा रुसलेला चेहरा बघून अण्णा तिला गुलकंद देतात. खरतर आजी-आजोबा शाबसकी किंवा कौतुक करायचं असेल तर चॉकलेट देतात पण आनंदीचे अण्णा तिला गुलकंद देतात.
या सगळ्यामध्ये अण्णांच्या मनामध्ये एकच प्रश्न सारखा येतो आहे तो म्हणजे या सगळ्यामध्ये आनंदीचे बालपण तर हरवणार नाही ना हे जाणून घेण्यासाठी बघत रहा बालपण देगा देवा कलर्स मराठीवर सोम ते शनि रात्री ९.०० वा.

Subscribe to receive free email updates: