‘फादर्स डे’च्या दिवशी आपण बाबा असल्याचा गश्मीर महाजनीचा धक्कादायक खुलासा


फादर्स डेच्या दिवशी एकिकडे सर्व सेलिब्रिटी आपल्या वडिलांसोबतचे आपले फोटो सोशल मीडियावरून शेअर करत असताना मराठी फिल्म इंडस्ट्रीचा हार्टथ्रोब गश्मीर महाजनीने मात्र ट्विटरवरून आपल्या मूलासोबतचा आपला फोटो शेअर केला.
गश्मीर महाजनीला मुलगा असल्याची बातमी त्याच्या चाहत्यांसोबतच मीडियालाही माहित नव्हती. त्यामूळे रविवारी दिवसभर मराठी सोशल मीडिया गाजला तो गश्मीरच्या ह्या ट्विटमूळे. अनेक तरूणींना त्याचा हा फोटो पाहून चांगलाच धक्का बसला. हे त्यांनी ट्विटरवरून गश्मीरला दिलेल्या प्रतिक्रियांमधून दिसून येत होतं.
गश्मीर सोशल मीडियाव्दारे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला, “तुझ्यासोबत घालवलेल्या त्या क्षणांनी मला वडिल होण्याचं महत्त्व आणि त्यातली ममता शिकवली. तूला आज मिस करतोयबाळा.
आतापर्यंत मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या मॅचोमॅनची इमेज असलेल्या गश्मीरमधला बाबाह्या फोटोमूळे सगळ्यांच्या समोर आला.

Subscribe to receive free email updates: