गश्मीर महाजनीचा गौरी गणपती

गश्मीर महाजनी - 
माझ्या आजोबांपासून आमच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होते. आमच्या घरी गौरी-गणपती असतात. 
आम्ही  इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतो. साधेचं डेकोरेशन करण्यावर आमचा भर असतो. आईच्या हातचे उकडीचे मोदक खायला माझी मित्रमंडळी येतात. पण मला मात्र उकडीचे मोदक अजीबात आवडत नाहीत. त्यामूळे मी बाकीच्या स्वादिष्ट भोजनावर मी ताव मारतो.माझी डान्स अकेडमी सुरू झाल्यापासून त्याचेही विद्यार्थी गणेशोत्सवाच्या काळात आवर्जून घरी येतात. त्यामूळे घर अगदी भरलेलं असतं. 
 कितीही काम असलं तरीही मी गणेशोत्सवाच्या काळात घरीच सुट्टी घेऊन राहण्यावर भर देतो. गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करणं, आणि त्याचे षोडशोपचारे पूजन करणं मला खूप आवडते.यंदा बाप्पाच्या आशिर्वादाने एका इंटरनैशनल प्रोजेक्टवर गणेशोत्सावाच्या काळातच काम सुरू करतोय. 

Subscribe to receive free email updates: