"देवा तुझ्या गाभाऱ्याला" या दुनियादारीमधील प्रचंड गाजलेल्या गाण्यापासून आदर्श व अमित यांचा गायक - संगीतकार म्हणून एकत्र प्रवास सुरु झाला. प्रल्हाद शिंदे वआनंद शिंदे यांच्या गायकीचा वारसा निर्विवादपणे पुढे घेऊन जात असलेला आदर्श आणि स्वकर्तृत्वावर मराठी सिनेसृष्टीमध्ये आपलं नाव आघाडीच्या संगीतकारांमध्येनेऊन ठेवणारा अमित यांच्या मैत्रीचे मजेदार किस्से या विशेष भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. स्टुडिओमध्ये एकत्र आल्यावर दर्जा गाण्यांची सुरावटपेरणारी ही जोडगोळी त्यांच्या खाजगी आयुष्यात नेमकी कशी आहे? आदर्श आणि अमित एकमेकांना नेमके किती ओळखतात? विशाखा सुभेदार, कमलाकर सातपुतेआणि प्रभाकर मोरे यांनी सादर केलेल्या धमाल विनोदी स्किटवर आदर्शची नेमकी काय प्रतिक्रिया आली? प्रसाद ओकने अमित राजला किशोर कुमार यांचं कोणतं गाणंगायला सांगितलं?
हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका दि. २५ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता "न.स.ते. उद्योग" आपल्या लाडक्या झी टॉकीजवर..