Best response to Sai Sevak Yojana (News-SSST, SHIRDI)


शिर्डी -
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या  समाधी शताब्‍दी  महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने दिनांक २९ जुलै २०१७ पासून सुरु करण्‍यात आलेल्‍या  साई सेवक योजनेस उत्‍तम प्रतिसाद मिळत असून देशातील विविध राज्‍यातून साईभक्‍त या योजनेत सहभागी होत आहे.
श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी  महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या संकल्‍पनेतून श्री साईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणे व भक्तांना सेवाभावी वागणूक मिळण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या साई सेवक योजनेमध्‍ये साई सेवकांचा २१ व्‍यक्‍तींचा ०१ गट तयार करण्यात येत असून मंगळवार ते सोमवार ०१ गट काम करत आहे. असे एका आठवडयात सकाळी ०६.०० ते दुपारी ०२.०० व दुपारी ०२.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत हे साई सेवक आठवडाभर सेवा देत आहेत. या योजनेमध्‍ये महाराष्‍ट्र, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पंश्चिम बंगाल, दिल्‍ली, ओरिसा, तामिळनाडू, मध्‍यप्रदेश, केरळ व उत्‍तराखंड आदी राज्‍यामधुन ५२० साई सेवक गटांनी नोंदणी केलेली असून आजतागायात ३६३ साई सेवक गटांच्‍या माध्‍यमातुन ७२६१ साईभक्‍तांनी साई सेवक योजनेतून सेवा दिलेली आहे. या योजनेत यापुढे १५७ साई सेवक गट प्रतिक्षा यादीवर आहेत.
या साई सेवकांना मंदिर परिसर, संरक्षण विभाग, श्री साईप्रसादालय, हॉस्पिटल, लाडु विभाग व निवासस्थाने याठिकाणी वर्षातून सलग ७ दिवस साई सेवेची संधी दिली जाते. हे साई सेवक सेवाभावी वृत्तीने भक्तांचा आदर करुन, सन्मान करुन “ओम साई राम” म्हणून साईभक्तांच्या अडचणी सोडवत आहे. या साई सेवकांना ओळखपत्र, गणवेश देवून त्यांची संस्‍थानच्‍या वतीने निवास, भोजन, नाष्‍टा व चहापाण्‍याची व्‍यवस्‍था  मोफत करण्‍यात येत आहे. दर मंगळवारी आलेल्‍या सेवेक-याचे स्‍वागत करण्‍यात येवून सेवा पुर्ण झालेल्‍या सेवक-यांचा संस्‍थानच्‍या वतीने प्रमाणपत्र देवून सन्‍मान केला जातो. तसेच या उपक्रमात सहभागी होणा-या साई सेवकांना स्‍वच्‍छता व व्यसनमुक्तीची शपथही दिली जाते.
या साई सेवक योजनेत सहभागी होण्‍यासाठी संस्‍थानचे कामगार विभाग (०२४२३) २५८८१०/११ या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.
Shirdi:
            Sai Sevak Scheme that has been started from 29th July 2017 on behalf of the Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi on the occasion of Shri Saibaba Samadhi Centenary Celebrations has been receiving excellent response and Sai devotees from all states of India are participating in this scheme.
            On the occasion of Shri Saibaba Samadhi Centenary Celebrations it was through a concept of Dr.Suresh Haware, Chairman of the Sansthan that this scheme was started. The objective was to improve the quality aspect of service at Shri Saibaba temple and for Sai devotees receive quality service.
            Under the Sai Sevak Scheme 01 group of 21 persons is created. One group works for one week from Tuesday to Monday. In this way groups provide service to the devotees between 6.00 am to 2.00 pm and 2.00 pm to 10.00 pm. Under this Scheme 520 Sai Sevak Groups from Maharashtra, Gujrat, Goa, Andhra Pradesh, Telangana, Karnataka, West Bengal, Delhi, Orisa, Tamilnadu, Madhya Pradesh, Kerala, Uttarakhand and others have registered their names and as on today 363 sai Sevak Groups have provided service through this Scheme. Now 157 Sai Sevak Groups are on the wait list.
            These Sai Sevaks are provided opportunity for continuous service for 7 days once in a year at Temple area, security department, Shri Sai Prasadalaya, Hospital, Ladu Vibhag and Bhakta Niwas. These Sai Sevak honor the devotees and welcome them with “Om Sai Ram” and resolve their difficulties. The Sai Sevaks are provided with Identity Cards and Uniform and the Sansthan arranges for their accommodation, food, breakfast and tea. The Groups arriving on every Tuesday are welcomed and the Sai Sevak completing their assignment are felicitated with a Certificate on behalf of the Sansthan. All Sai Sevaks participating in the program are given an oath for cleanliness and freedom from addiction.
            Shri Saibaba Sansthan Trust has appealed to all Shri Sai devotees to contact Labor Department of the Sansthan (Telephone Number 02423 – 258810/11) for participation in this Sai Sevak Scheme.

Subscribe to receive free email updates: