कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस !


मुंबई २७ मे२०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये काल रंगला WEEKEN चा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत ज्यामध्ये त्यांनी घरातील सदस्यांसोबत झालेल्या टास्कविषयी चर्चा केल्या, सदस्यांच्या चुका देखील दाखवून दिल्या. तसेच बिग बॉस मराठीच्या घरामधील व्हिलन सदस्यांनाच ठरवायला सांगितल्यास काहींनी सुशांतला तर त्यांनी काहींनी आस्तादला तर काहींनी सईमेघा आणि स्मिताला ठरवले. परंतु सगळ्यात जास्त सदस्यांना आस्ताद बिग बॉस मराठीच्या घरातील व्हिलन वाटत असल्याने त्याला व्हिलन साठी असलेल्या विशेष खुर्चीत बसावे लागले. सुशांत आणि आस्तादला त्यांच्या टास्क मध्ये झालेल्या चुका आणि त्यांच्या चुकीच्या वागणुकीबद्दल देखील सल्ले दिले तसेच ते कार्यक्रमामध्ये चांगले दिसत नसल्याचे देखील बजावले. या सल्ल्यानंतर सुशांत आणि आस्ताद किती बदलतात हे लवकरच कळेल. तेंव्हा बघायला विसरू नका आजWEEKENDचा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही सदस्यांवर गाणी प्ले करण्यात येणार आहेत आणि सदस्यांनी ते कोणासाठी आहे हे ओळखायचे आहे. जसे पल भर के लिये हम कोई प्यार कर ले – सई साठी तर ना जाने कहा से आई है – शर्मिष्ठा साठीनाम बडे और दर्शन खोटे – जुई गडकरी साठी प्ले करण्यात आले आणि ते सदस्यांनी अचूक ओळखले. तसेच यावेळेस सुशांत, सई,मेघा असे काही सदस्य डेंजर झोनमध्ये असताना यावेळेस घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळे सेफ असताना महेश मांजरेकर का मेघाला म्हणाले सगळ्यांचा निरोप घे आणि बाहेर ये हे आजच्या भागामध्ये कळेलच.
तेंव्हा बघायला विसरू नका आज WEEKENDचा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर. कोण होणार येत्या आठवड्यामध्ये नॉमिनेट कोण बनणार बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोणाला सोडावे लागणार घर काय असतील या आठवड्यामधील टास्क हे जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवी ९ वा. फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: