- राजेश शृंगारपुरे सिक्रेट रूममध्ये
- बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया सुरु
- मेघा वाचवेल का रेशमला नॉमिनेशन प्रक्रीयेमधून ?
- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रेशम पडली एकटी ?
मुंबई ८ मे, २०१८ : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल रेशम किंवा राजेश यांमधून कोणा एकाचे एलिमनेशन होणार होते परंतु, राजेश शृंगारपुरे याला बिग बॉसने सिक्रेट रूम मध्ये ठेवले आहे. जिथून तो स्पर्धकांचे संभाषण ऐकू शकतो. परंतु,घरातील सदस्यांसाठी मात्र राजेश एलिमनेट झाला आहे. बिग बॉसच्या या निर्णयामुळे रेशम टिपणीस मात्र पूर्णपणे एकटी पडली असे तिने बिग बॉसला सांगितले. बिग बॉसने रेशमचे सांत्वन करण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु, राजेशच्या घरामधून जाण्याने ती पूर्णत: कोलमडून गेली आहे. राजेश आणि रेशम दोघांचेही घरामध्ये खूप चांगले ट्युनिंग होते हे प्रेक्षकांना तसेच घरच्यांना देखील चांगलेच माहिती आहे. तेंव्हा, रेशम या धक्क्यातून कशी स्वत:ला सावरेल ? घरचे तिला साथ देतील का ? हा प्रश्नच आहे. तसेच काल पासून बिग बॉसने घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी एक वेवेगळाच टास्क घरातील रहिवाश्यांना दिला. ज्यामध्ये पुष्कर कालच नॉमिनेट झाला आहे. उषाजी पुष्करला वाचवू शकतील का ? आज कोण नॉमिनेट होईल ?घरातील सदस्य एकमेकांना साथ देतील का ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
बिग बॉसच्या घरामध्ये कधी कोण कोणाची साथ देईल आणि कधी साथ सोडेल हे सांगता येणार नाही. बिग बॉसने काल घरातून बाहेर जाण्याची प्रक्रीयेचा टास्क स्पर्धकांना सांगितला. ज्यामध्ये पहिलेच खुर्चीवर बसल्याने पुष्कर घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाला आहे. जो त्या खुर्चीवर बसेल त्याला बिग बॉस घरातील ज्या सदस्याचे नाव सांगतील त्याला टास्क मध्ये सहभागी करून घेणे अनिवार्य ठरणार असून, त्या सहभागी झालेल्या सदस्याने बिग बॉसने दिलेले कार्य पूर्ण करणे महत्वाचे आहे. असे झाले नाही आणि तो सदस्य ते कार्य करण्यास अपयशी ठरेल आणि खुर्चीवर बसलेला सदस्य थेट घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी नॉमिनेट होईल असे बिग बॉसने सांगितले.
उषाजींना अनिल थत्ते यांसारखे तयार व्हायचे असून, पुष्करसाठी त्या हे करण्यास तयार झाल्या आहेत त्या पुष्करला वाचू शकतील का ? हे आजच्या भागामध्ये समजेल. आज सई मेघाला वाचविण्यासाठी तिच्या लाडक्या फोटोला कापणार असून तिने घरामध्ये आणलेल्या एक गोष्टीला फाडायचे आहे. जे ती मेघासाठी करणार आहे. तेंव्हा मेघा सेफ आहे कि नाही ? हे देखील आजच्या भागामध्ये कळणार आहे. या टास्क मध्ये पुष्कर मेघावर थोडासा वैतागलेला दिसणार आहे. पुष्करला मेघाचे वागणे खटकण्यास सुरुवात झाली आहे. रेशमला घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेमधून वाचविण्यासाठी मेघाला मौन व्रत ठेवायचे आहे,ज्यास मेघाचा नकार आहे. पण, रेशम तिला हे करण्यासाठी मान्य करण्याचा प्रयत्न करत आहे. मेघा रेशमला वाचवण्यासाठी तयार होईल का ? हे आज प्रेक्षकांना कळेल. तसेच सई, सुशांत, उषाजी यांना वाचविण्यासाठी घरातील सदस्यांन बिग बॉस काय काय करण्यासाठी सांगणार आहेत हे बघणे उत्सुकतेचे असेल.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिलेले कार्य पार पाडणे अनिवार्य असते जे घरातील रहिवाश्यांनी उत्तमरीत्या पार पाडले त्यामुळे बिग बॉस काही भेटवस्तू स्पर्धकांना देणार आहेत. बिग बॉसने दिलेल्या या भेटवस्तू store room मधून आस्ताद स्पर्धकांना आणून देणार आहे. त्या भेटवस्तू काय असतील हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.
तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.