कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस !


  • बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झाले मेघा धाडेच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन !
  • आस्ताद होईल का यशस्वी दिलेल्या कार्यामध्ये ?
  • या आठवड्यामध्ये सगळे असणार सुरक्षित ...
मुंबई २३ मे२०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रेशम आणि मेघामध्ये सदस्यांनी  बहुमताने रेशमला सुरक्षित करण्यात आले तर मेघाला घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी नॉमिनेट करण्यात आले. मेघाचा काल वाढदिवस होतायाच दिवशी तिला घरातील सदस्यांनी घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले. मेघाने काल पुष्कर जवळ मनात दडलेल्या खूप गोष्टी बोलून दाखवल्या. रेशम आणि माझ्यामध्ये जर ठरवायचे झाले तर मीच सुरक्षित होण अपेक्षित होते असे मत तिने व्यक्त करून तिची नाराजगी व्यक्त केली. पुष्कर, सईआऊ सगळ्यांवरच ती खूप चिडलेली होती असे दिसून आले. परंतु सई मात्र मेघाला वाचविण्यासाठी तिच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आले जे आस्तादने देखील मान्य केले. सई सुध्दा नॉमिनेट झाल्याने पुष्कर आणि मेघाशी बोलत नसल्याचे दिसून आले. या आठवड्यामध्ये कोणताही सदस्य घराबाहेर जाणार नाही या गोष्टीशी घरातील सदस्य अनभिज्ञ आहेत त्यामुळे जे नॉमिनेट झाले आहेत त्यांची चिडचिड होणे स्वाभाविक आहे तर जे नाही झाले ते आनंदी आहेत. तसेच काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगला “मर्डर मिस्ट्री चा टास्क. या प्रकारचा टास्क या घरामध्ये पहिल्यांदाच खेळला जातो आहे. ज्यामध्ये आस्ताद काळे खुनी तर स्मिता आणि सुशांत गुप्तहेर आहेत तर बाकीचे घरातील सदस्य सामान्य नागरिक आहेत. काल टास्क संपता संपता पुष्करचा खून झाला आहे असे बिग बॉसने घोषित केले. तेंव्हा हा टास्क बघायला विसरू नका आजसुध्दा बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज होणार मेघाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन. मेघाचा वाढदिवस घरामध्ये साजरा केला जाणार असून सगळे यासाठी गार्डन एरियामध्ये एकत्रित होणार आहेत. तसेच “मर्डर मिस्ट्री” या टास्क मध्ये होणार आहे अजून एक खून. परंतु हे खून शारीरिक नसून सांकेतिक असणार आहेत. काल घरामध्ये आस्तादने पुष्करचा फोटो लपवला आणि बिग बॉसची घोषणा झाली कि पहिला खून झालेला आहे. तसेच आज रेशम टिपणीसचा खून होणार आहे. या दरम्यान स्मिता गुप्तहेराची भूमिका बजावताना दिसणार असून आता तीन सदस्य संशयाखाली आहेत मेघा, भूषण आणि आस्ताद.
सुशांत आणि स्मिता शोधू शकतील का कोण आहे खरा खुनी अजून कोणाचा खून बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार ?रेशमचा खून करण्यासाठी आस्तादने काय केले आस्ताद या टास्कमध्ये यशस्वी होईल का हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग बघणे आवश्यक आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठीचा आजचा भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: