मुंबई, ६ डिसेंबर २०१६ : मराठी आणि हिंदी सीनेसृष्टीत, मालिकांद्वारे तसेच रंगमंचावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अबाधित स्थान निर्माण केलेल्या अष्टपैलू अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या छोट्या पडद्यावर पुन्हाएकदा येत आहेत. कलर्स मराठीशी त्यांचे नात खूप जून आहे “चार दिवस सासू” चे या मालिकेमुळे त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आणि सगळ्यांच्या लाडक्या झाल्या. आता तब्बल ३ वर्षांनंतर त्या पुन्हा कलर्स मराठीवरील “सख्या रे” या नवीन मालिकाद्वारे परत येत आहेत. या मालिकेमध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. रोहिणीजींसोबत या मालिकेत प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येणार आहे त्यांचा लाडका अभिनेता सुयश टिळक तसेच ज्ञानदा रामतीर्थकार या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
“सख्या रे” या मालिकेमध्ये रोहिणीजी राजघराण्यातील मासाहेबांची भूमिका साकारणार आहेत. नावावरूनच व्यक्तिरेखा भारदस्त असणार आहे. नक्कीच त्यांच्या अभिनयाच्या साथीने हि भूमिका अजूनच वजनदार होईल यात शंका नाही. प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून रोहिणी हट्टंगडी यांना छोट्या पडद्यावर बघण्याची जी हुरहूर होती ती आता लवकरच क्षमणार आहे. कलर्स मराठीवर “सख्या रे” हि मालिका लवकरच सुरु होणारा असून या मालिकेतील रोहिणीजींची भूमिका आणि त्यांचे नवे रूप नक्कीच प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाहि.
तेंव्हा बघायला विसरू नका “सख्या रे” कलर्स मराठीवर लवकरच !