
आजचा तंत्रज्ञानाचा वेग अफाट आहे आणि आजच आपले पोलीस सुद्धा माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर आणि तांत्रिक माहिती पुरविण्यासाठी आवश्यक अद्ययावत प्रणालीने सुसज्ज आहे. पण पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. १९८० च्या काळात जेव्हा अनेक प्रकारच्या गुन्हे घडत असत तेव्हा पोलिसांना ते सोडवण्यासाठो स्वतःची हुशारी आणि खबऱ्यांचे नेटवर्क यावरच अवलंबून राहावं लागायचे. या काळात अमीरजादा नावबखान हा कुविख्यात गुंड चरस गांजा यांच्या तस्करीमध्ये असायचा. त्या काळात अमीरजादाच्या पठाण गँगचा मोठा दबदबा होता. त्याच्या नावावर अनेक गुन्हे होते पण कोण्ही त्याच्या विरुद्ध उभं राहायला तयार नसायचा. त्यावेळी महाराष्ट्र पोलिसांमध्ये खबऱ्यांचे अतिशय उत्कृष्ट नेटवर्क असलेला अत्यंत हुशार असा पोलीस अधिकारी इसाक बागवान हा क्राईमब्रँचच्या टीम मध्ये होता. जेव्हा दिलीप कुमार यांच्या शक्ती सिनेमाच्या निर्माता मुशीरभाईंचं किडनॅपिंग ची केस क्राईमब्रँचच्या टीम ने स्वीकारली तेव्हा इसाक बागवान याना, हि केस देण्यात आली. अत्यंत हुशारीने इसाक बागवान यांनी अमीरजादा आणि त्यांच्या साथीदारांना एक एक करून आपल्या जाळ्यात अडकवले. त्या काळात ना मोबाईल होते ना जीपीस होते मात्र बागवानांची गुन्ह्याची उकल काढताना विचार करण्याची पद्धत , त्यांची हुशारी आणि खबऱ्यांच नेटवर्क यामुळेच ते अमीरजादाच्या प्रत्येक जागेवर पोहचायचे. पण नेहमीच तो निसटून जायचा आणि मात्र शेवटी त्यांनी अमीरजादाला शोधले आणि जेरबंद केले.
अमीरजादा केस गाजली कारण भरकोर्टात मान्यवर माननीय न्यायमूर्तींच्या डोळ्यादेखत अमीरजादावर डेव्हिड या मारेकऱ्याने बंदुकीने घातलेल्या गोळ्या आणि त्यांनतर मारेकऱ्याला पकडताना बागवान यांनी दाखवलेलं प्रसंगवधान, हे थरार नाट्य हे सुद्धा मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासातील पहिली घटना होती. भर कोर्टातुन जर मारेकरी पळून गेला असता तर पोलीस खात्याचीच नव्हे तर न्याय देवतेची अब्रू सुद्धा वेशीवर टांगली गेली असती.
झी युवा या वाहिनीवरील, ८० च्या काळात अत्यंत गाजलेली अशी " अमीरजादा केस" ही “शौर्य - गाथा अभिमानाची " या कार्यक्रमधील पुढील स्टोरी आहे. एक अत्यंत हुशार, जवाबदार आणि कर्त्यव्य दक्ष पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी ज्या प्रकारे ह्या केसचा मागावा केला आणि कोर्टात शौर्याने मारेकऱ्याला पकडले हे सर्व अकल्पनीय आहे. कर्तव्यदक्ष आणि धाडसी महाराष्ट्र पोलिसांच्या अश्याच वेगवेगळ्या शौर्यगाथा आपल्याला झी युवावर, शौर्य - गाथा अभिमानाची या कार्यक्रमाद्वारे पहायला मिळणार आहे. इसाक बागवान यांनी अनुभवलेला हाच थरार,त्यांनी केलेलं हेच शौर्य या आठवड्यात येत्या शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ९ वाजता पुन्हा झी युवा वर घर बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या डोळ्यांनी अनुभवू शकणार आहात .
“शौर्य – गाथा अभिमानाची " या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे सचिन मोहिते, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.
Related Posts :
Indian Ocean and Aisi Taisi Democracy kick-off RED FM’s all new music and comedy property - ‘MusiCom’
Music and comedy enthusiasts gear up for an all new live platform from RED FM, bringing the two art forms together, across 6 cities in Ind… Read More...
4 Films Division documentaries win IDPA Awards. (Eng , Mar, Guj)
Mumbai / July 25, 2017
‘Kapila’ and ‘Living the Natural Way’, the two documentaries produced by Films Division, Mumb… Read More...
Doctors shortage, lack of smart content a bitter pill for hospital management… Read More...
Alt Balaji's Dhimaner Dinkaal Trailer is out now!
India’s largest online platform for original and exclusive shows, ALTBalaji earlier today announced the release of its first ever Bengali … Read More...
Indian Ocean and Aisi Taisi Democracy kick - off Red FM's MusiCom
24th July, 2017, National: Red FM, India’s leading FM network announced the dates for its new IP ‘Musicom’. The event will tak… Read More...