आपल्या विविध चित्रपटांतून सामाजिक भान जपत मनोरंजक चित्रपट बनविणारा संगीतकार-दिग्दर्शक म्हणजे अवधूत गुप्ते. नुकताच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘कान्हा’ या चित्रपटातूनही असाच वेगळा विषय मांडला गेला. दहीहंडी उत्सवाची सध्यस्थिती दर्शविणाऱ्या ‘कान्हा’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर रविवार १८ डिसेंबरला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. ‘झी टॅाकीज’वर होणार आहे.
दहीहंडीचा थरार बघता अलीकडे हा उत्सव यात खेळणाऱ्या मुलांच्या जीवावर बेतायला लागला आहे. यात सहभागी होणाऱ्या मुलांची सुरक्षा महत्त्वाची की उत्सव महत्त्वाचा? पारंपारिक सणाचं स्वरूप योग्य की त्याला आलेलं इव्हेंटचं स्वरूप योग्य? अशा अनेक प्रश्नांवर ‘कान्हा’ सिनेमात भाष्य करण्यात आलंय. दहीहंडी उत्सवातलं राजकारण व त्यात भरडले जाऊन एकमेकांसमोर उभे ठाकलेले मल्हार आणि रघू यांची गोष्ट ‘कान्हा’चित्रपटामधून बघायला मिळणार आहे. वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, प्रसाद ओक, किरण करमरकर, गौरी नलावडे, सुमेध वाणी या कलाकारांच्या अभिनयाने आकारास आलेला ‘कान्हा’ प्रेक्षकांना मनोरंजनासोबत विचार करायला प्रवृत्त करणारा आहे.
‘कान्हा’ - रविवारी १८ डिसेंबरला दुपारी १२.०० वा. व सायं. ७.०० वा. ‘झी टॅाकीज’वर नक्की पहा.