सई ताम्हणकरने दिली फेसबुक ऑफिसला भेट

सई ठरली पहिली मराठी अभिनेत्री जिने फेसबुक ऑफिस मधून केले फॅन्ससोबत लाईव्ह चॅट
सोशल मीडियावर सर्वाधिक फॅन फॉलोविंग असलेली मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिने फेसबुक ऑफिसला नुकतीच भेट दिली आणि फक्त भेटच नव्हे तर सईने फेसबुकच्या ऑफिस मधून तिच्या फॅन्ससोबत गप्पा देखील मारल्या. या फेसबुक लाईव्ह चॅट मध्ये सई आणि तिच्या फॅन्समध्ये २०१६ हे वर्ष तिला कसं गेलं आणि फेसबुक याबद्दल गप्पा रंगल्या. सईला मॅनेज करणाऱ्या ड्रीमर्स पी.आर. अँड मार्केटिंग या एजन्सीने पुढाकार घेऊन सईचे हे लाईव्ह चॅट घडवून आणले. अर्थातच सईचा फॅन फॉलोविंग जास्त असल्यामुळे तिच्या या लाईव्ह चॅटला रिस्पॉन्सही तितकाच जबरदस्त आणि तगडा मिळाला. एका तासात तिला १० लाखच्या वरती व्युज मिळाले आहे. सई ही फेसबुकच्या मुंबई हेडऑफिस मधून लाईव्ह चॅट करणारी पहिली अभिनेत्री आहे. 

Subscribe to receive free email updates: