'विकता का उत्तर'मध्ये जमली कलाकारांची मांदियाळी

जिथे सामान्य माणूसही स्टार बनतोअशा एकमेव 'विकता का उत्तरया रीअॅलिटी शोचा यंदाचा आठवडा रसिकांना भरघोस मनोरंजनाची मेजवानी देणारा ठरणार आहे. महाराष्ट्रातील कानाकोप-यातून आलेल्या स्पर्धकांच्या भाव- भावनांचा वेध घेणाऱ्या या शोमध्ये कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर दर शुक्रवार ते रविवार होत असलेल्या या कथाबाह्य कार्यक्रमात भाग घेणारे रोल ओवर कंटेन्टस्टंट या शोचे प्रमुख आकर्षण आहेत. 
दि.१६१७ आणि १८ डिसेंबरच्या भागात 'विकता का उत्तरच्या सेटवर स्थानिक कलाकारांची रेलचेल पाहायला मिळेल. यापूर्वी मागील आठवड्यात सांताक्रुझ  येथील सुहास नार्वेकर यांच्या 'नटसम्राटच्या भूमिकेला लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होतेगतआठवड्यातील हीच गम्मत यंदाच्या भागात देखील प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. कारण मुळचे लातूरचे असणारे दिनेश नेरुणे आणि परभणीचे प्राध्यापक श्रीपाद काळे हे स्पर्धक यंदाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. त्यापैकी दिनेश नेरुणे हे स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्यया मालिकेतून रसिकांसमोर आले होतेतर श्रीपाद काळे हे एक ज्येष्ठ नाट्यकर्मी आहेत. त्यांनी परभणी येथे'नटसम्राट'चे यशस्वी  ३० प्रयोग केले असूनराम शेवाळकरप्रभाकर पणशीकर तसेच मोहन वाघ या ज्येष्ठ रंगकर्मीच्या हस्ते त्यांचा सत्कारदेखील झाला आहे. 
या दोन स्थानिक कलाकारांसोबतच सुमित वेदक आणि अमोल धस हे स्पर्धक देखील 'विकता का उत्तरच्या यंदाच्या आठवड्यात आपले नशीब अजमावणार आहेत. या सगळ्यांसोबत रितेश देशमुखने केलेली  विनोद आणि हास्याची लयलूट हे या भागाचे मुख्य आकर्षण असेल.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :